आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. प्ले-ऑफच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी RCB ला आता फक्त एका विजयाची गरज आहे. परंतू आगामी सामन्यांआधी RCB च्या संघासमोर एक नवीन संकट निर्माण झालं आहे. संघाचा महत्वाचा गोलंदाज नवदीप सैनीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. RCB च्या फिजीओंनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात १८ व्या षटकादरम्यान सैनीला ही दुखापत झाल्याचं कळतंय.

“नवदीप सैनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. काही दिवसांपूर्वी सैनीला त्याच जागेवर दुखापत झाली होती आणि चेन्नईविरुद्ध सामन्यात नेमक्या त्याच जागेवर बॉल लागला. त्याच्या जखमेवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. सध्या संघातले डॉक्टर त्याच्या जखमेवर लक्ष ठेवून आहेत आणि पुढील सामन्यात तो खेळू शकेल की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.” RCB चे फिजीओ इवान स्पिचले यांनी माहिती दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : तू तेव्हाही विजेता होतास आणि आजही आहेस ! धोनीसाठी साक्षीचा खास संदेश

RCB विरुद्ध सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी संयमी फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. परंतू दुसऱ्या सामन्यात राजस्थानने मुंबईवर मात केल्यामुळे चेन्नईचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

अवश्य वाचा – BLOG : चेन्नईसाठी खरं आव्हान तर पुढे आहे !