कोल्हापूर: गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पावसाची सतत धार चालू आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकुर गैबीघाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मोठमोठे दगड राज्य मार्गावर आले आहेत. राधानगरी तालुक्यात पावसाची सतत धार चालू असल्याने पहिल्याच पावसात देवगड निपाणी राज्य मार्गावरील सोळांकुर घाटात छोट्या धबधब्या शेजारी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.

हेही वाचा : फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ! काय चुकलं याचं विचार मंथन – राजू शेट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरड कोसळताना या राज्य मार्गावर कोणतेही वाहन नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण तरी दरड कोसळण्याचे प्रमाण अजूनही थांबलेले नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिला आहे. महापूर काळात तळ कोकणात जाण्यासाठी हा राज्यमार्ग महत्त्वाचा असून या राज्य मार्गावर सतत पडणाऱ्या दरडीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर योग्य ती उपाययोजना करावी असं मत प्रवाशांनी व्यक्त केलंय.