लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जलजीवन अभियान या ग्रामीण भागातील महत्त्वाकांक्षी पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना सहा महिन्यांपासून निधी नसल्याने ही कामे रखडली आहेत. सुरवातीचे अंदाजपत्रक घाईगडबडीत केले आहे. त्यामुळे वाढीव वस्त्या, अपुऱ्या कामांना मंजुरी देवून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन केली.

राज्यामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत १ कोटी ४६ लाख ७१ हजार ७४६ कुटुंबाना नळाचे पाणी नियमितपणे पुरवण्याचे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केंद्र सरकारकडून या योजनेचा निधी प्राप्त न झाल्याने कामे रखडली असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईला पुन्हा सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. राज्यात दौरा करत असताना अनेक गावांतील ही कामे निकृष्ठ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

आणखी वाचा-कोल्हापूरच्या राजकारणात आबिटकरांचे प्रकाशपर्व!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर जिल्ह्यात नवीन १७ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने निविदाची कार्यवाही होवू शकलेली नाही. त्यास कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी मंत्र्यांकडे केली.