कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले आहेत. नीतिमत्तेच्या गोष्टी करणाऱ्या मोदींनी सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकार चोरून बनवले, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी येथे केली. अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन त्यांनी येथे आयोजित सभेत केले.

सभेला खासदार शाहू महाराज, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी गांधी यांनी ऋतुराज पाटील, राजेश लाटकर, गणपतराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित, नितीन गडकरी यांचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी हे देशाची प्रगती झाली असे प्रत्येक भाषणात सांगत असतात. आजही महिलांना महागाईचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना हमीभावासाठी झगडावे लागते. बेरोजगारांना नोकऱ्यांसाठी पायपीट करावी लागते. विकासाचे कोणतेही प्रश्न सोडवले गेले नाहीत. त्यांनी देशातील उद्योगपतींची १६ लाख कोटींची कर्जे माफ केली, परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका गांधी यांनी केली.

हेही वाचा – Mitali Thackeray : प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भ्रष्टाचारावर बोलण्याचे तुमचे धाडस कसे होते, असा प्रश्न उपस्थित करून गांधी म्हणाल्या, की महाराष्ट्रातील लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले शासन तुम्ही खरेदी केले. अशा मोदी यांना संविधानावर बोलण्याचा कोणता अधिकार आहे, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. पंतप्रधान तर सोडा त्यांचे मंत्रीही सामान्य लोकांना भेटत नाहीत. किंबहुना सामान्य जनतेचे दैनंदिन जीवनाचे कोणते प्रश्न आहेत हेच त्यांना माहीत नाही. केवळ सत्ता मिळवणे हेच मोदी यांचे धोरण आहे. एकीकडे सभा मंचावर गेले की ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि कोकणात शिवाजी महाराजांचा पुतळा पडला जातो. त्यांना शिवाजी महाराजांच्या धोरणाशी काहीच देणे-घेणे नाही.