scorecardresearch

बंडखोर नेत्यांच्या पोस्टरला शिवसैनिकांनी काळे फासले

शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत अशा घोषणा दिल्या.

shiv sena workers shiv-sena-workers
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पोस्टरला येथे शिवसैनिकांनी सोमवारी काळे फासले.

कोल्हापूर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पोस्टरला येथे शिवसैनिकांनी सोमवारी काळे फासले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज येथील आरके नगर मध्ये शिवसेना करवीर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिंदे, आबिटकर, क्षीरसागर यांच्या पोस्टरला काळे फासले. या पोस्टवर गद्दार असा उल्लेख केला होता. पोस्टरला जोडे मारत संताप व्यक्त केला. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत अशा घोषणा दिल्या. तालुकाप्रमुख विराज पाटील, उपतालुकाप्रमुख अनिल पाटी,ल अरुण अब्दागिरी, विवेक काटकर, चंद्रकांत संकपाळ, रणजित कोंडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sainiks blacken posters of rebel mla s leaders zws

ताज्या बातम्या