News Flash

टिक टॉक बंदीवरून अश्विनने घेतली वॉर्नरची फिरकी, म्हणाला…

भारताने ५९ चिनी अ‍ॅपवर घातली बंदी

भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सोशल मीडियावर इतर खेळाडूंची मस्करी करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. भारतात सोमवारी ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर अश्विनने डेव्हिड वॉर्नरचीही फिरकी घेण्याची मजा लुटली. करोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने होत नसल्याने ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. याचसोबत तो आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासह टीक टॉकवर डान्स करण्यात किंवा व्हिडीओ बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसून आले आहे. भारतात त्याच्या व्हिडिओचा वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे.

वॉर्नर भारतीय फॅन्ससाठी हिंदी आणि दक्षिण भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसून आला. भारतात टिक टॉक या अ‍ॅपवर बॅन घातल्यानंतर अश्विनने ट्विटरवर वॉर्नरची फिल्मी स्टाईलने मस्करी केली. वॉर्नरला टॅग करत त्याने लिहिले, “अप्पो अनवर… डेव्हिड वॉर्नर!” सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्या १९९५ साली आलेल्या ‘माणिक भाषा’ या चित्रपटातला हा प्रसिद्ध डायलॉग आहे. त्याच स्वरात अश्विनने वॉर्नरला उद्देशून विचारलं, “(टिक टॉकबंदीनंतर) आता डेविड वॉर्नर काय करणार?”

डेव्हिड वॉर्नरचे टिक टॅक व्हिडिओ भारतात खूपच प्रसिद्ध आहेत. शिल्पा शेट्टी, महेश बाबूसहित अनेक सिनेस्टार त्याचे चाहते झाले आहेत. “हल्ली वॉर्नर आमच्याशी बोलण्यात व्यस्त नसतो. तो डान्स करण्यात आणि इकडे तिकडे फिरण्यात व्यस्त असतो. त्याच्या कूल अंदाजामुळे त्याने भारतात चाहता वर्ग तयार केला असून एक वेगळेच वातावरण तयार केले आहे”, असे काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता. तर, “हैदराबादचे चाहते वॉर्नरवर खूपच खूष आहेत. वॉर्नरला भारतीय संघात निवडलं जाणं शक्य नाही, पण टॉलिवूडच्या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी जरूर मिळेल”, असे सनरायझर्स हैदराबादचा मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 5:14 pm

Web Title: after india bans tiktok r ashwin takes a dig at david warner vjb 91
Next Stories
1 पाक क्रिकेटर्सची पुन्हा झाली करोना चाचणी
2 Video : पाहा द्रविडने टिपलेले अफलातून झेल
3 भविष्यात कर्णधारपदासाठी रोहित शर्मा सर्वोत्तम पर्याय – आकाश चोप्रा
Just Now!
X