चंद्रकांत पंडित यांची मध्य प्रदेशचे रणजी प्रशिक्षक म्हणून केलेली नेमणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंडित यांच्या निवडीबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आले, असा दावा क्रिकेट समिती करीत आहे, तर समितीचा नेमणुकीत सक्रिय सहभाग असल्याचे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले आहे

‘‘पंडित यांच्या नियुक्तीसंदर्भात आम्हाला मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप योगेश गोळवलकर, प्रशांत द्विवेदी आणि मुर्तझा अली यांचा समावेश असलेल्या क्रिकेट समितीने बुधवारी केला होता. परंतु हा आरोप संघटनेने फेटाळून लावला आहे.

‘‘क्रिकेट समितीनेच चंद्रकांत पंडित यांच्या नावाचा प्रस्ताव आमच्याकडे सादर केला होता. या नियुक्तीआधी क्रिकेट समितीने पंडित यांच्याशी चर्चाही केली. मग आता क्रिकेट समिती आपल्या भूमिकेपासून दूर का जात आहे, हेच कळत नाही,’’ अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव संजीव राव यांनी व्यक्त केली.