अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही सामन्यांत भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला अनुक्रमे १९५ आणि २०० धावांवर रोखलं. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघात जागा मिळालेल्या मोहम्मद सिराजने पहिल्याच कसोटीत दोन्ही डावांत मिळून ५ बळी घेतले.

अवश्य वाचा – आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप

दौऱ्याच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजच्या वडिलांचं हैदराबाद येथे अल्पशा आजाराने निधन झालं. मात्र यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात राहणं पसंत केलं. सिराजच्या या कामगिरीचं वासिम जाफरने कौतुक केलं आहे.

दरम्यान या सामन्यात सिराजने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. कसोटी पदार्पणात गोलंदाजीची सुरुवात न करताही सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराज आता दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. याचसोबत बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण करुन ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा सिराज पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – कर्णधार अजिंक्यचा मेलबर्नमध्ये डंका, धोनीसोबत मानाच्या पंगतीत स्थान