News Flash

IND vs AUS : विराट की स्मिथ… सर्वोत्तम कोण? गंभीर म्हणतो…

भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिका उद्यापासून

भारतीय संघ १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतात होणारी ही मालिका ३ सामन्यांची असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा क्रिकेट मालिका रंगते, तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात तुलना झाली नाही तरच नवल. सध्यादेखील विराट आणि स्मिथ यांच्यात कोण सर्वोत्तम याबाबत चर्चांना उधाण आले आहे. विविध खेळाडू यावर आपले मतप्रदर्शन करत आहेत. याच मुद्द्यावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आपले रोखठोक मत मांडले आहे.

Video : अरे देवा!! भर मैदानात अंपायरचं बघा काय चाललंय…

काय म्हणाला गंभीर?

“निर्धारित षटकांच्या म्हणजेच एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये विराट कोहली हा स्टीव्ह स्मिथपेक्षा खूप चांगला आणि दर्जेदार फलंदाज आहे. त्या दोघांमध्ये तुलना होऊच शकत नाही. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये मी कोहलीची स्मिथशी अजिबात तुलना करणार नाही. मला खरं तर आता स्मिथ कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येतो तेच बघायचं आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवते की तिसऱ्या क्रमांकावर त्याला पाठवून चौथ्या क्रमांकावर लाबूशेन फलंदाजीला येतो याची मला उत्सुकता आहे”, असे मत गंभीरने व्यक्त केले.

विरेंद्र सेहवागनं कसोटीची तुलना डायपरशी करत केला ICC च्या प्रस्तावाला विरोध

भारतीय गोलंदाजांबद्दलही मांडलं मत

“जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे दोघे डेव्हिड वॉर्नर किंवा फिंच यासारख्या प्रतिभावंत फलंदाजांना कशी गोलंदाजी करतात हे मला पाहायचं आहे. भारतातील खेळपट्ट्या या तुलनेने सपाट असतात. त्यामुळे त्यांची गोलंदाजी पाहायला मी आतुर आहे. एक गोष्ट चांगली आहे की दोनही गोलंदाजांकडे वेग आहे. वेगवान आणि स्विंग गोलंदाजी करून ते गडी बाद करू शकतात”, असे गंभीर म्हणाला.

CSK चा खेळाडू संघात परतला; ‘या’ देशाविरूद्ध खेळणार टी २० मालिका

मालिकेचे वेळापत्रक

१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)

“BCCI, जरा लाज वाटू द्या”; संजू सॅमसनला वगळल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संताप

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 1:51 pm

Web Title: ind vs australia virat kohli or steve smith who is better gautam gambhir reaction vjb 91
Next Stories
1 Video : अरे देवा!! भर मैदानात अंपायरचं बघा काय चाललंय…
2 विरेंद्र सेहवागनं कसोटीची तुलना डायपरशी करत केला ICC च्या प्रस्तावाला विरोध
3 CSK चा खेळाडू संघात परतला; ‘या’ देशाविरूद्ध खेळणार टी २० मालिका
Just Now!
X