भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. ‘लोकल बॉय’ फिरकीपटू अक्षर पटेलने सहा बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सलामीवीर जॅक क्रॉलीचे अर्धशतक वगळता इतर कोणताही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडचा सामन्यातील पहिला गडी घेतला, तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने अक्षरला उत्तम साथ देत तीन बळी टिपले.

Ind vs Eng Video: …अन् अश्विनने उडवला त्रिफळा; फलंदाजही झाला अवाक

इंग्लंडने संघात चार महत्त्वाचे बदल केले. त्यात जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनला संघात स्थान मिळाले. त्यांच्यासह सलामीवीर जॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांनाही संघात संधी देण्यात आली. जॅक क्रॉलीने अर्धशतक ठोकले पण बेअरस्टोसह इतर सर्वच फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आपल्या हटके ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने राहुल गांधी यांचा व्हिडीओ पोस्ट करत इंग्लंडच्या फलंदाजीची खिल्ली उडवली.

Ind vs Eng: “ही अभिमानाची नव्हे, शरमेची बाब”: पंतप्रधान मोदींवर संतापले नेटीझन्स

दरम्यान, कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. डॉम सिबली आणि जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाले. सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक केलं. कर्णधार जो रूट (१७) स्वस्तात बाद झाला. जॅक क्रॉली अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (६), ओली पोप (१), जोफ्रा आर्चर (११), जॅक लीच (३) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३) सारेच स्वस्तात बाद झाले.