न्यूझीलंड दौऱ्यात वन-डे मालिकेपासून भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी हे संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरत आलेली आहे. कसोटी मालिकेतही भारतीय फलंदाजांची हीच अपयशी कामगिरी सुरु राहिली. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावात ७ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर भारताकडे मोठी आघाडी घेण्याची चांगली संधी होती. मात्र ट्रेंट बोल्ट-टीम साऊदी यांच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज झटपट माघारी परतले.

अवश्य वाचा – Ind vs NZ : ‘त्या’ भन्नाट कॅचवर रविंद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांसारखे आघाडीच्या फळीतले फलंदाजही अगदी स्वस्तात माघारी परतले. काही भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट अक्षरशः फेकल्या. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीवर जसप्रीत बुमराहने आपलं मत व्यक्त केलं आहे. “आम्हाला कोणालाही दोष द्यायचा नाहीये. ही भारतीय संघाची संस्कृती नाही. काही सामन्यांमध्ये विकेट घेण्यात आम्ही अपयशी ठरतो…त्यावेळी फलंदाज आम्हाला दोषी ठरवत नाहीत. मात्र कामगिरीत सुधारणा होण्यास नक्कीच वाव आहे यात काही शंका नाही.”

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने ९० धावांच्या मोबदल्यात ६ फलंदाज गमावले. यानंतर तिसऱ्या दिवसात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर १३२ धावांचं आव्हान उभं केलं. वेलिंग्टन कसोटी सामन्यातही काही फलंदाजांचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाजांनी निराशा केली होती.

अवश्य वाचा – Ind vs NZ : अजिंक्यची ही आतापर्यंत सर्वात खराब खेळी – हरभजन सिंह