न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात दुखापतग्रस्त महेंद्रसिंह धोनीने संघात पुनरागमन केलं. चौथ्या सामन्यात भारतीय फलंदाजीची उडालेली दाणादाण पाहता, धोनीचं संघात असणं गरजेचं असल्याची भावना अनेक चाहत्यांनी बोलून दाखवली. मात्र अखेरच्या सामन्यातही भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. शिखर धवन, रोहित शर्मा, शुभमन गिल हे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतले. हे तिन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात आला.

भारतीय संघ अडचणीत सापडलेला पाहून भारतीय चाहत्यांना धोनी संघाला संकटातून बाहेर काढेल अशी आशा होती. मात्र ट्रेंट बोल्टने टाकलेल्या एका भन्नाट चेंडूवर धोनी अवघ्या एका धावेवर त्रिफळाचीत झाला. बोल्टने टाकलेल्या चेंडूचं कोणतही उत्तर धोनीकडे नव्हतं, धोनी आऊट झाल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मात्र महत्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या अंबाती रायुडू, विजय शंकर, हार्दिक पांड्या, केदार जाधव यांनी फटकेबाजी करुन भारतीय संघाला 252 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील वेळापत्रकात बदल