News Flash

IND vs SL : ‘त्या’ घटनेनंतर मी विचलित झालो; पृथ्वी शॉनं केलं मान्य

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पृथ्वीला सामनावीर पुरस्कार मिळाला.

पृथ्वी शॉ

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी केली. पण या खेळीदरम्यान एक चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला. या घटनेमुळे थोडा वेळ सुन्न झाल्याचे आणि काही स्पष्ट दिसत नसल्याचे पृथ्वीने सामन्यानंतर सांगितले. शॉने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २४ चेंडूत ९ चौकारांसह ४३ धावा केल्या. कर्णधार शिखर धवनसह त्याने भारताला ५८ धावांची तुफानी सुरुवात दिली. पहिल्या पाच षटकांत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून तो किती चांगल्या फॉर्मात आहे, हे दिसून आले.

पृथ्वी शॉला फलंदाजीसाठी सामनावीर ठरवण्यात आले. सामन्यानंतर पृथ्वी म्हणाला, ”मी आता ठीक आहे. हे जरा वेदनादायक आहे, पण ठीक आहे. चेंडू आदळळ्यानंतर मी किंचित सुन्न झालो होतो आणि मला स्पष्ट दिसत नव्हते. या घटनेनंतर मी विचलित झालो. मी खेळपट्टी सोडली पाहिजे होती. आतापासून मी काळजी घेईन.”

आजकाल बॅक हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर कंकशन टेस्ट आवश्यक आहे. त्याअंतर्गत फिजिओ खेळाडूची तपासणी करतो आणि जर त्याला काही अडचण असेल, तर तो सामन्यातून माघार घेऊ शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार कंकशन रिप्लेसमेंटची सोय आहे. परंतु श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान शॉने फिजिओच्या तपासणीदरम्यान स्वत: ला योग्य सिद्ध केले आणि फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाचव्या षटकात दुश्मंता चामिराचा चेंडू पृथ्वीच्या हेल्मेटवर आदळला.

हेही वाचा – IND vs SL: वाढदिवस, वनडे पदार्पण आणि झंझावाती अर्धशतक! इशान किशनने नोंदवला खास विक्रम

पृथ्वी म्हणाला, ”मी आता पूर्णपणे ठीक आहे. जेव्हा मी बाद झालो तेव्हा राहुल द्रविड सर काही बोलले नाहीत. मी कमकुवत चेंडूंवर धावा केल्या. मला स्कोअरबोर्ड धावता ठेवण्याची इच्छा होती. खेळपट्टी खूप चांगली होती. पहिल्या डावात खेळपट्टी चांगली होती, पण दुसऱ्या डावात ती अधिक चांगली झाली. मला वेगवान गोलंदाजांना सामोरे जायला आवडते.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:50 am

Web Title: ind vs sl prithvi shaw says he was dizzy and blurry after the helmet blow adn 96
Next Stories
1 IND vs SL: वाढदिवस, वनडे पदार्पण आणि झंझावाती अर्धशतक! इशान किशनने नोंदवला खास विक्रम
2 क्रॅमनिकला नमवून आनंदने स्पार्कासन करंडक जिंकला
3 भारत-श्रीलंका क्रिकेट मालिका : त्रिकुटामुळे भारताचे वर्चस्व
Just Now!
X