जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. या दरम्यान पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने वेगळ्या प्रकारे चाहत्यांशी संवाद साधला.

VIDEO : टिकटॉक व्हिडीओ सुरू असतानाच आवाज आला, “नको… नाही…”

लॉकडाउन काळात आपल्या चाहत्यांशी आपला संपर्क राहावा यासाठी मोहम्मद युसुफने ट्विटरवर एक प्रश्न उत्तरांचं सत्र घेतले. त्याने सुरूवातीलाच आपल्या चाहत्यांना सांगितलं की तुम्ही मला काही प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरे देइन. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. युसुफनेही त्या प्रश्नांची झकासपैकी उत्तरे दिली. ‘विराट कोहलीचं वर्णन थोडक्यात कसं करशील?’, असा प्रश्न त्याला एका चाहत्याने विचारला. त्यावर मोहम्मद युसुफने अजिबात वेळ दवडला नाही. त्याने लगेच त्या प्रश्नावर उत्तर दिले. ‘सध्याच्या घडीला अव्वल नंबरचा क्रिकेटपटू. एक महान खेळाडू’, असे उत्तर देत त्याने भारतीय चाहत्यांचीही मने जिंकली.

सचिन म्हणतो, “…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे स्तुत्य पाऊल

करोनाच्या तडाख्या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेट विश्वाशी संबंधित असलेल्या खेळाडू, सहकारी, पंच वर्ग तसेच मैदानावरील कर्मचारी यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. करोनामुळे सगळीकडेच गरीब आणि गरजू लोकांचे हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथम श्रेणी खेळाडूंना २५ हजारांची मदत देण्यात येणार आहे. त्या सह पंच आणि समानाधिकारी वर्गातील लोकांना २० हजार आणि मैदानाची निगा राखणाऱ्या ग्राऊंड स्टाफला १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.