IPL 2019 मध्ये विराटसेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरू संघाची कामगिरी सुमार दर्जाची होती. चांगले खेळाडू असूनही त्यांना १४ सामन्यात एकूण ११ गुणच मिळवता आले. त्यामुळे IPL 2020 साठी बंगळुरूने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि ट्रेनग शंकर बसू यांनी IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरू संघाच्या संघ व्यवस्थापनात पुनरागमन केले आहे. बंगळुरू संघाने त्यांना तंदुरूस्ती मार्गदर्शक (strength and conditioning coach) म्हणून ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
विराटसोबत शंकर बसू
टीम इंडियासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतानाच ते एका खासगी जिमच्या संचालक मंडळावरही कार्यरत होते. त्यामुळे लाभाचे पद भूषवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र आता त्यांना बंगळुरू संघाने प्रशिक्षक वृंदात सामील करून घेतले आहे.
बसूंव्यतिकित अॅडम गिफिथ यांनाही प्रशिक्षक वृंदात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. गिफिथ यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ताफ्यात सामील करून घेण्यात आले आहे. तर श्रीधरन श्रीराम यांना फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. याशिवाय, इव्हॅन स्पीचली याला फिझीयो, मलोलन रंगराजहंस आणि सौम्यदीप पैन यांचाही ताफ्यात समावेश करून घेण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 10:35 am