भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नीतिमूल्यांसंबंधी असलेल्या नियमावलींचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करीत बिहार क्रिकेट संघटनेचे चिटणीस आदित्य वर्मा यांनी आयसीसीकडे धाव घेतली आहे.
शर्मा यांनी आयसीसीच्या कायदा समितीचे प्रमुख इयान हिगिन्स यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी श्रीनिवासन यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
श्रीनिवासन यांनी अनेक वेळा आयसीसीच्या नियमावलींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे परिषदेची प्रतिष्ठा मलिन होत आहे. मुदगल समितीने सट्टेबाजी व मॅचफिक्सिंगबाबत दिलेल्या अहवालात श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांच्यावर ठपका ठेवला आहे.
न्यायालयानेही श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाच्या कामापासून दूर राहावे असा आदेश दिला असूनही मंडळाचा कारभार श्रीनिवासन यांच्या आदेशानुसारच होत आहे. श्रीनिवासन यांच्याकडून झालेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत आयसीसीने स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करण्याची आवश्यकता आहे.