05 March 2021

News Flash

गरजेनुसार विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो – गावसकर

इंग्लंडमधलं वातावरण ठरेल निर्णायक !

विराट कोहली (संग्रहित छायाचित्र)

२०१९ साली इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना, भारतीय फलंदाजीच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजीचं कोडं सुटलेलं नाहीये. मधल्या फळीतलं आपलं स्थान निश्चीत करण्यासाठी अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक हे खेळाडू सध्या शर्यतीत आहेत. अशावेळी विराट कोहली विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो असं सूचक विधान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं होतं, ज्याला माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी पाठींबा दिला आहे.

“जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाला फलंदाजीच्या क्रमात आपलं स्थान राखून ठेवण्याची गरज नसते. मात्र काहीवेळा गरजेनुसार गोष्टी बदलाव्या लागतात. इंग्लंडमध्ये विश्वचषकादरम्यानचं वातावरण हे वेगळं असेल, गोलंदाजांना याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. अशावेळी प्रतिस्पर्धी संघाने ३०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष दिलं आणि भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर माघारी परतल्यास विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो”, गावसकरांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – Pulwama Terror Attack : विराट कोहलीने पुरस्कार सोहळा टाकला लांबणीवर

याच कारणासाठी भारताने आपला पर्यायी सलामीवीराच्या जागेसाठी सर्वोत्तम खेळाडूचा विचार करायला हवा. त्याची शैली ही इतर फलंदाजांप्रमाणेच तंत्रशुद्ध असली पाहिजे. जर वातावरणाचा भारतीय संघावर काही विपरीत परिणाम झाला नाही तर विराट नेहमीप्रमाणे आपल्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो, गावसकरांनी कोहलीच्या फलंदाजीच्या जागेविषयी भाष्य केलं. २४ फेब्रुवारीपासून भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ टी-२० आणि ५ वन-डे सामन्याची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार – एम.एस.के. प्रसाद

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2019 12:38 pm

Web Title: sunil gavaskar opens up about virat kohlis batting position in odi side
Next Stories
1 गब्बर-हिटमॅनच्या जोडीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्यता
2 Pulwama Terror Attack : विराट कोहलीने पुरस्कार सोहळा टाकला लांबणीवर
3 ‘या’ ३ कारणांमुळे मुंबई इंडियन्सचा मयांक मार्कंडे भारतीय संघात
Just Now!
X