मुंबईचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि सर्फराज खान यांना गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आह़े  ‘या दोन्ही खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय व्यवस्थापकीय समितीने घेतला असून त्यावर त्यांचे उत्तर अपेक्षित आह़े  सूर्यकुमारने मुंबईच्या जलदगती गोलंदाजाशी हुज्जत घातली होती, तर सर्फराजने सामन्यादरम्यान आक्षेपार्ह हावभाव केले होते’, अशी माहिती एमसीएचे सचिव नितीन दलाल यांनी दिली़
रणजी क्रिकेट स्पध्रेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी सूर्यकुमारने कर्णधारपद भूषविले होते, परंतु तामिळनाडूविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडल़े १७ वर्षीय सर्फराजने कुच बिहार स्पध्रेच्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अर्धशतक झळकावल्यानंतर आक्षेपार्ह हावभाव केले होत़े  त्यामुळे एमसीएने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना उत्तर देण्यासाठी आठवडय़ाचा कालावधी दिला आह़े.