हार्दिक पंडय़ाशी तुलनेचे दडपण बाळगण्यापेक्षा माझ्यातील कौशल्य विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित करीन, असे मत भारताचा अष्टपैलू विजय शंकरने व्यक्त केले. निदाहास चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून विजय मिळवला. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शंकरला सामनावीर पुरस्कार मिळाला.
याबाबत शंकर म्हणाला, ‘‘प्रत्येक दिवशी अधिकाधिक खेळ उंचावणे, हे मला महत्त्वाचे वाटते. बऱ्याचशा क्रिकेटपटूंना तुलना आवडत नाही. हार्दिकसुद्धा अष्टपैलू असल्याने माझी त्याच्या कामगिरीशी तुलना करणे स्वाभाविक आहे. पण त्याचे दडपण बाळगणे मला योग्य वाटत नाही.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2018 4:52 am