भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.
भारताचा धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही युजवेंद्र चहल-धनश्री जोडीला त्याच्या स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो कल्पक पद्धतीने वारपला आणि चहलला शुभेच्छा दिल्या. मोदींच्या एका भाषणात मोदी म्हणाले होते की संकटकाळातदेखील आपण सकारात्मक संधी शोधायला हव्या. मोदींचा हाच संदेश विनोदी पद्धतीने वापरत त्याने चहल-धनश्रीला शुभेच्छा दिल्या.
Waah @yuzi_chahal ! Aapda ko avsar mein badal daala. Congratulations https://t.co/qQYe0Q3iNf pic.twitter.com/J7u7tJJEDj
— Virender Sehwag (@virendersehwag) August 8, 2020
दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच IPL 2020मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.