वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा निकाल लागण्याआधीच भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या रविंद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. ३२ वर्षीय जडेजाचे सर्वाधिक म्हणजेच ३८६ पॉइण्ट्स असून वेस्ट इंडिज संघाचा कर्णाधार जेसन होल्डर आणि इंग्लंडचा बेन स्ट्रोक्स हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मागील क्रमावारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या होल्डरचे २८ पॉइण्ट कमी झाले आहेत. त्यामुळेच जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये ऑक्टोबर २०१८ नंतर पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. या आदीमध्ये आर. अश्विनचाही समावेश आहे. अश्विन या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.

नक्की पाहा >> मॅचचं मरु द्या… विराट कपड्यांसाठी नक्की कोणती पावडर वापरतो ते आधी सांगा; भन्नाट मिम्स व्हायरल

विशेष म्हणजे सध्या सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता अधिक असल्याचं चित्र दिसत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटीमधील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि रोहित शर्मा या दोन भारतीय खेळाडूंचाही कसोटीमधील अव्वल १० फंलदाजांमध्ये समावेश आहे. ७४७ अंकांसहीत पंत आणि रोहित शर्मा दोघेही संयुक्तरित्या या यादीत सहाव्या स्थानावर आहेत.

नक्की वाचा >> क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

अष्टपैलू खेळाडूंच्या यादी खालीलप्रमाणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेळाडू – देश – अंक
१) रविंद्र जडेजा – भारत – ३८६
२) जेसन होल्डर – वेस्ट इंडिज – ३८४
३) बेन स्ट्रोक्स – इंग्लंड – ३७७
४) रविचंद्रन अश्विन – भारत – ३५३
५) साकिब अल हसन – बांगलादेश – ३३८
६) केली जेमीसन – न्यूझीलंड – २७६
७) मिचेल स्टार्क – ऑस्ट्रेलिया – २७५
८) पॅट कमिन्सन – ऑस्ट्रेलिया – २४९
९) कॉलिन डी ग्रँडहोमे – न्यूझीलंड – २४३
१०) क्रिस व्होक्स – इंग्लंड – २२९