scorecardresearch

Australian Open 2023: पहिलाच सामना खेळायला उतरला अन् चक्क रॅकेट गेली चोरीला; राफेल नदालसोबत अजबच घडलं, पाहा video

Rafel Nadal on Australian Open 2023: आजपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच सामन्यात राफेल नदालच्या रॅकेटसोबत एक किस्सा घडला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्याने सलामीचा सामना देखील जिंकला.

Australian Open 2023: पहिलाच सामना खेळायला उतरला अन् चक्क रॅकेट गेली चोरीला; राफेल नदालसोबत अजबच घडलं, पाहा video
सौजन्य- Australian Open (ट्विटर)

Rafel Nadal on Australian Open 2023: रॉड लेव्हर एरिना येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ च्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सध्या राफेल नदाल जॅक ड्रॅपर विरुद्ध खेळत आहे. या स्पॅनिश खेळाडूने पहिला सेट ७-५ असा जिंकला, पण नंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याला २-६ असा पराभव पत्करावा लागला. दुसरा सेट गमावल्यानंतर पुन्हा उसळी घेत विजयावर शिक्कामोर्तब करण्याचे लक्ष्य ठेवले ज्यात तो यशस्वी ठरला. त्याने तिसरा सेट ६-४ तर चौथा सेट ६-१ ने जिंकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने विजयी सलामी दिली.

२२ वेळा प्रमुख एकेरी चॅम्पियनने रॉड लेव्हर एरिना येथे अनोखी कामगिरी केली कारण त्याला चालू सामन्यात त्याचे रॅकेट सापडले नाही. आणि कोर्टवर सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. त्याचे रॅकेट शोधण्यात अयशस्वी झाल्यानंतर, नदालला एका बॉल बॉयने चकवले असल्याचे समजल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला. अखेर त्यानंतर नदालने त्याच्या बॅगेतून दुसरे रॅकेट बाहेर काढले. या किस्स्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गतविजेता  नदालचे लक्ष विक्रमी २३ वे ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद जिंकण्यासाठी असेल. २००९ मध्ये त्याने रॉजर फेडररला अंतिम फेरीत पराभूत करून आपले पहिले ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावले. असे करणारा, तो पहिला स्पॅनिश खेळाडू बनला तसेच हा त्याचा पहिला हार्ड-कोर्ट ग्रँड स्लॅम फायनल सामना देखील होता. २००९ ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीचा सामना ग्रँडस्लॅमच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सामना होता. त्यात त्याने उपांत्य फेरीत त्याच्याच देशाचा सहकारी फर्नांडो वर्डास्कोचा ६-७(१), ६-४, ७-६(२), ६-७(१), ६-४ असा केला होता. हा सामना पाच तास चौदा मिनिटे चालला.

हेही वाचा: IND vs SL: अंदाज धोनीचा हेलिकॉप्टर षटकार विराटचा; ‘अरे हा तर माही शॉट!’ म्हणणाऱ्या विराटचा video व्हायरल

२०२२ मध्ये, नदालने अंतिम फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे दुसरे विजेतेपद जिंकले. २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आणि फेडरर आणि नोव्हाक जोकोविच (त्यावेळी दोघांचीही २० होती) यांच्याशी असलेली बरोबरी तोडली होती. ओपन एरामधील दोन वेळा जिंकणारा नदाल हा दुसरा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याचा ७६-१५ असा विजय-पराजय विक्रम आहे (विजय टक्केवारी ८४). त्याने २०१२, २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये उपविजेते म्हणून १७ प्रयत्नांत विजेतेपद पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 13:48 IST

संबंधित बातम्या