scorecardresearch

आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, उमरान मलिक, दिनेश कार्तिकला संधी, विराटला विश्रांती

समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे.

dinesh karthik and umran malik
दिनेश कार्तिक आणि उमरान मलिक यांना संघात स्थान देण्यात आले .

आयपीएलचे यंदाचे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या २९ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रीय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय घोषणा केली आहे. तर इंग्लंडविरोधातील पुनर्निर्धारित कसोटी सामन्यासाठी १७ सदस्यीय संघ घोषित केला आहे.

हेही वाचा >>> DRS का घेतला नाही? खुद्द ऋषभ पंतने सांगितलं कारण; दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर

भारताचा टी-२० मालिकेसाठी संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

हेही वाचा >>> दिल्लीविरोधातील सामन्यात मुंबईचा विजय, फायदा मात्र बंगळुरुला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा

हेही वाचा >>>मुंबईचा विजय होताच बंगळुरुकडून जंगी सेलिब्रेशन; कोहली, फॅफ डू प्लेसिसची फूल टू धमाल, पाहा व्हिडीओ

येत्या ९ जून ते १९ जून या कालावधित भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. तसेच येत्या 1 ते 5 जुलै दरम्यान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरोधात पुनर्निर्धारित पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारत सध्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcci announced india squad for t20i series against sa and for 5th test against england umran malik dinesh karthik included prd

ताज्या बातम्या