अन्वय सावंत, लोकसत्ता

चेन्नई : अशोक चक्रवर्ती आणि मनोज जैस्वाल. एक सचिन तेंडुलकरचा चाहता, तर दुसरा राहुल द्रविडचा. द्रविड आणि सचिन यांनी क्रिकेटला अलविदा करून बराच काळ झाला. मात्र, या चाहत्यांचे क्रिकेटप्रेम किंचितही कमी झालेले नाही.

हेही वाचा >>> Zainab Abbas: पाकिस्तानी क्रीडा पत्रकार झैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टी, हिंदुविरोधी देव-देवतांच्या ट्वीटमुळे सापडली वादात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोलकाताचे रहिवासी असलेले हे दोघे तब्बल ३२ तास प्रवास करून भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पोहोचले होते. कडक ऊन असूनही डोक्यावर मुकुट, त्यावर क्रिकेटपटूंचे छायाचित्र, चेहऱ्यावर व कपडय़ांवर तिरंगा, तर हातात कृत्रिम विश्वचषक.. अशी त्यांची वेशभूषा होती. त्यांनी शंखनाद करत वेगळे वातावरण निर्माण केले. ‘‘मी भारतीय संघ आणि कोलकाता नाइट रायडर्सचा चाहता आहे. विश्वचषक बघणे हे माझे स्वप्न होते, ते साकार झाले. इतका लांब प्रवास करणे सार्थकी लागले. पुढील सामन्यांतही आम्ही असाच पाठिंबा देत राहू,’’ असे अशोक चक्रवर्ती म्हणाला.