ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मैदानात टी-२० मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना टी-२० क्रमवारीत फायदा झालेला आहे. आयसीसीने टी-२० मालिकेनंतर नवीन क्रमवारी जाहीर केली. ज्यात भारतीय संघाचा उप-कर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची सुधारणा झाली असून तो तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला मागे टाकलं.

कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे. अंतिम सामन्यात विराटने केलेल्या ८५ धावांच्या खेळीचा त्याला चांगला फायदा झाला आहे. तर सांघिक क्रमवारीत टीम इंडियाने आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक होता…परंतू ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बाजी मारल्यामुळे भारताला तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे.