ICC World Cup 2023: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुल २०२३च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी वर्ल्डकप तिकिटांसाठी खूप चिंतेत दिसला. तिकिटासाठी कुणालाही उत्तर देणार नसल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. सध्या राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करत आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून शानदार विजय मिळवला.

‘जिओसिनेमा’शी बोलताना राहुलने विश्वचषकाच्या तिकिटासाठी कोणालाच उत्तर देणार नसल्याचा स्पष्ट संदेश कुटुंबीय आणि जवळच्या लोकांना दिला आहे. के.एल. राहुल म्हणाले की, “वर्ल्डकप तिकिटांबाबत मला कोणीही मेसेज करू नये. जर कोणी मला सामन्याच्या तिकिटासाठी मेसेज केला तर मी त्याला प्रतिसाद देणार नाही. इथे गर्विष्ठ किंवा उद्धट होण्याचा प्रश्न नाही फक्त या सर्वांपासून दूर राहण्याचा आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न आहे. हा संदेश माझ्या सर्व कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी आहे. तुम्ही मला तिकिटांसाठी मेसेज करण्याचा विचार करत असाल तर, कृपया करू नका.”

हेही वाचा: Asian Games 2023, Hockey: चक डे इंडिया! भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, उझबेकिस्तानवर १६-०ने मिळवला दणदणीत विजय

याशिवाय राहुलने फलंदाजी आणि विकेटकीपिंगसाठी स्वत:ला कसे तयार केले याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “मला माहित आहे की मी संघात चांगले पुनरागमन केले आहे, त्यामुळे मला फलंदाजी आणि कीपिंग करावी लागेल. मी नुकतीच जरा बरी फलंदाजी करतो आहे पण त्यापेक्षा विकेटकीपिंग करणे हे खूप मोठे शारीरिक आव्हान आहे. मला हे माहीत होते, त्यामुळे मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली. एक क्रिकेटपटू म्हणून, आम्हाला माहित आहे की, आम्हाला मैदानावर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आम्ही सराव आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये जे केले त्याचीच पुनरावृत्ती सामन्यात करण्याचा प्रयत्न करतो.”

दुसरा एकदिवसीय सामना राहुलच्या नेतृत्वाखाली इंदोरमध्ये खेळवला जात आहे

उल्लेखनीय बाब अशी आहे की, राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रविवारी (२८ सप्टेंबर) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा वन डे सामना खेळवला जात आहे. याआधी मोहालीत खेळवण्यात आलेला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: IND W vs BAN W: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पदक केले निश्चित, उपांत्य फेरीत आठ विकेट्सने बांगलादेशला चारली धूळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी आपापले अर्धशतक पूर्ण केले. त्यांच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे गेली आहे. दोघांमध्ये दीडशतकी भागीदारी झाली असून भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या दोघांनाही भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जायला आवडेल. तत्पूर्वी, मागील सामन्यातील अर्धशतकवीर ऋतुराज गायकवाड फारशी काही मोठी खेळी करू शकला नाही, तो केवळ आठ धावा करून बाद झाला.