भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्त झाला. धोनीने आपल्या कार्यकाळात अनेक चषक जिंकले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अलीकडेच, टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या पराभवानंतर लोकांना या दिग्गजाची आठवण येऊ लागली. महेंद्रसिंग धोनी छोट्या प्रकारामध्ये संघाचा मार्गदर्शक म्हणून टीम इंडियात परत येऊ शकतो, अशा अनेक बातम्या आल्या होत्या. ही बातमी पसरल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बटनेही धोनीबद्दल आपले मत मांडले म्हणाला धोनीच्या येण्याने भारतीय संघाला खूप मोठा फायदा होईल.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट म्हणाला की, “धोनीच्या येण्याने भारतीय संघाला खूप फायदा होईल. तो ज्या प्रकारचा कर्णधार होता. त्याचे नियोजन आणि त्याचा शांत स्वभाव संघासाठी शस्त्र म्हणून काम करेल.” बट पुढे म्हणाला, “तो ज्याप्रकारे विचार करतो याचा खेळाडूंना निश्चितच फायदा होईल. मेन्टॉर म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट खूप पुढे जाईल. तुम्ही अनुभवावर मात करू शकत नाही. कारण त्याव्यक्तीने आयुष्यात तेच सर्व अनुभव घेतलेले असतात त्यामुळे तुम्ही त्याच्या विचार करण्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत.”

हेही वाचा :  तब्बल पाच वर्षांनी होणार दिल्लीत कसोटी सामना! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे टीम इंडिया भूषवणार यजमानपद 

सलमान बट्ट म्हणाला, “मला कोचिंगबद्दल जास्त माहिती नाही पण व्हीव्हीएस लक्ष्मण हा एक उत्तम खेळाडू आहे. सेहवागही चांगला खेळायचा पण कोचिंगच्या बाबतीत मी धोनीची निवड करू इच्छितो जो संघासाठी इतरांपेक्षा चांगला निकाल देऊ शकेल.” तो पुढे म्हणाला, “जर आपण रणनीतीने श्रेष्ठ आणि नेतृत्वाबद्दल बोललो, तर कोचिंग हे नेतृत्वही असते, मेन्टॉरशिपही असते, त्यामुळे मी धोनीला जितका यशस्वी कर्णधार पाहिला आहे, तितकाच टीम इंडियासाठी माझी पहिली पसंती महेंद्रसिंग धोनी असेल.”

हेही वाचा :  “कोणताही दबाव न घेता फलंदाजी करा, पण…”, प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणचा भारतीय संघाला सल्ला 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सलमानने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवरही आपले मत मांडले. सूर्यकुमारला सलामीवीर म्हणून संधी द्यावी का, या प्रश्नाच्या उत्तरात सलमान बट्ट म्हणाला, “सूर्यकुमार हा असा फलंदाज आहे की तो कोणत्याही परिस्थितीत पॉवर प्लेसारखा खेळतो. त्याची फलंदाजी कशी असावी यावर माझा विश्वास असला तरी संघाला त्याची गरज कुठे आहे हे त्याच्या उपयुक्ततेवर अवलंबून आहे. यावर भारतीय संघ व्यवस्थापनचं योग्य तो निर्णय घेईल.”