Suryakumar Yadav Funny Reaction After Loosing Toss: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय कर्णधाराने नाणेफेक गमावण्याची ही पहिलीच वेळ नाही. वनडे, कसोटी क्रिकेटपासून ते टी-२० क्रिकेटपर्यंत भारतीय कर्णधारांनी सामने जिंकले आहेत, पण नाणेफेक जिंकता आलेलं नाही. दरम्यान या सामन्यात नाणेफेक गमावताच कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलेली रिअॅक्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाने सामने जिंकले आहेत. पण नाणेफेक जिंकण्यात भारतीय फलंदाज अनलकी राहिले आहेत. युवा कर्णधार शुबमन गिलने गेल्या ११ सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये नाणेफेक गमावले आहे. तर दुसरीकडे कर्णधार सूर्यकुमार यादवने लागोपाठ १५ सामन्यांमध्ये नाणेफेक गमावले होते. मात्र,आशिया चषक २०२५ स्पर्धेत यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात सूर्याने नाणेफेक जिंकून ही मालिका थांबवली होती. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुन्हा एकदा सूर्याला नशिबाची साथ मिळालेली नाही.

गेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यातही या सामन्यातही सूर्यकुमार यादवने नाणेफेक गमावले आहे. दरम्यान नाणेफेक गमावताच सूर्याने हातात पुजेची थाळी घेऊन आरती करतानाचा ईशारा केला. नाणेफेकीसाठी येण्यापूर्वी पुजा करून यावं लागेल, असं त्याला म्हणायचं होतं. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तिलक वर्मा आणि शुबमन गिल ५, संजू सॅमसन २, सूर्यकुमार यादव १ आणि तिलक वर्मा शून्यावर माघारी परतले.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (India)अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया (Australia)मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉयनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड