Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील आज तिसरा दिवस असून तो निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इंदूरच्या वळणदार खेळपट्टीवर दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी कांगारूंच्या फिरकीपटूंना बळी पडले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला ७६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा बचाव करत भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.
भारतीय संघाचा पहिला डाव १०९ धावांत गुंडाळला. त्यानंतर त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या डावात ८८ धावांनी पिछाडीवर असताना केवळ १६३ धावांत आटोपली. अशा परिस्थितीत स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी ७६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाने २०१७ मध्ये पुणे कसोटी सामन्यात विजय मिळविला –
ऑस्ट्रेलियन संघ २०१७ मध्ये स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाच्या अंतर्गत पुण्यातील सामन्यात भारतीय संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला. त्या सामन्यात, विजयाचा हिरो फिरकीपटू स्टीव्ह ओकिफ होता. इंदूरमध्ये हेच काम मॅथ्यू कुहनमेनने आणि नॅथन लायन यांनी केले आहे. त्यामुळे ६ वर्षानंतर, ऑस्ट्रेलियन संघ देशात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
विजयासाठी जागतिक विक्रम मोडला पाहिजे –
अशा परिस्थितीत, जर भारतीय संघाने कांगारूंच्या विजयाचे स्वप्न भंग करायचे असेल, तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जोडीला काहीतरी विशेष करावे लागेल. ज्यासाठी ते नेहमीच क्रिकेटच्या इतिहासात लक्षात ठेवले जातील. जर भारतीय संघाने शुक्रवारी जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी मिळविण्यात यश मिळवले, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान धावंसख्येचा यशस्वीरित्या बचाव करणारा पहिला संघ ठरेल.
ऑस्ट्रेलियाने ८५ धावांचा केला होता बचाव –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यशस्वीरित्या संघाने बचत केलेली सर्वात कमी स्कोअर ८५ धावांची आहे. हा विक्रम ऑस्ट्रेलियाने १८८२ मध्ये इंग्लंडमधील ओव्हल ग्राउंडमध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता. विजयासाठी चौथ्या डावात ८५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला ७७ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
यापूर्वी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०७ धावांच्या लक्ष्याचा बचाव करून भारतीय संघाने विजय मिळविला आहे. कसोटी इतिहासातील टीम इंडियाने यशस्वीरित्या बचाव केलेला हा सर्वात छोटी धावसंख्या आहे. २००४ च्या सामन्यात १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या दिवशी ९३ धावांवर आटोपला. अनिल कुंबळे आणि मुरली कार्तिक यांच्या प्राणघातक गोलंदाजी केली. त्यामुळे या