India vs Australia 3rd T20: सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे. या मालिकेतील उर्वरित तीन सामने कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खूप खास असणार आहेत. जर त्याने या मालिकेत ६० धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २००० हजार धावा करणारा भारताचा सर्वात वेगवान फलंदाज ठरेल.

सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी आहे

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ५५ सामन्यांच्या ५२ डावांमध्ये शानदार फलंदाजी करताना १९४० धावा केल्या आहेत. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील उरलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने आणखी ६० धावा केल्या तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जलद २००० धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. सध्या हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने टी-२०च्या ५६ डावात २००० धावा केल्या होत्या. दुसरीकडे, के.एल. राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. के.एल. राहुलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ५८ डाव घेतले होते.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

भारताकडून सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय २००० धावा करणारे खेळाडू

विराट कोहली, ५६ डाव

के.एल. राहुल, ५८ डाव

हेही वाचा: IND vs AUS: मालिका गमावण्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियाने केले संघात सहा बदल, जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन

सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्मात आहे

सूर्यकुमार यादव टी-२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. यामुळेच तो सध्या आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांमध्ये सूर्याने आतापर्यंत ९९ धावा केल्या आहेत. आगामी सामन्यांमध्येही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा सर्वांना असेल.

भारतीय संघ मंगळवारी (२८ नोव्हेंबर) गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्यांनी २-० अशी आघाडी घेतली आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेईल. २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने दोन विकेट्सने विजय मिळवला होता. तीन दिवसांनंतर तिरुवनंतपुरममधील दुसरा सामना ४४ धावांनी जिंकला.

हेही वाचा: Hasan Ali: “मला आयपीएल…”, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीचे मोठे विधान

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी-२० सामना तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहू शकता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. येथे तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता. डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर सामना विनामूल्य पाहू शकतात.