Why Australia Are Chasing 131 Despite India Making 136 In 26 Overs: बहुप्रतिक्षित अशा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला आज १९ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागनामुळे या मालिकेची सर्वाधिक चर्चा आहे. पण रोहित-विराट पहिल्याच सामन्यात अपयशी ठरत लवकर माघारी परतले. याशिवाय भारताच्या डावात पावसाने व्यत्यत आणल्याने अखेरीस सामना २६ षटकांचा करण्यात आला. यासह भारताने प्रथम फलंदाजी करताना १३६ धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३१ धावांचे लक्ष्य का देण्यात आले, जाणून घेऊया.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. पावसाची सातत्याने हजेरी असलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या, परंतु यजमान संघाला १३१ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

भारतीय संघाची सुरूवात या सामन्यात खूपच खराब झाली. भारताने २५ धावांत रोहित, विराट आणि गिलच्या रूपात ३ मोठे विकेट गमावले. पावसाच्या हजेरीमुळे पर्थमधील सामना तिसऱ्यांदा थांबवण्यात आला. तिसऱ्यांदा जेव्हा पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारत १६.४ षटकांत ४ बाद ५२ धावांवर होता. यानंर सामना सुरू झाल्यानंतर सामन्याची षटकं २६ षटकांपर्यंत कमी करण्यात आली.

२६ षटकांचा सामना झाल्यानंतर अक्षर पटेल (३८ चेंडूत ३१) आणि केएल राहुल (३१ चेंडूत ३८) यांनी भारतीय डावाला गती दिली आणि संघाला खराब सुरुवातीनंतर सावरण्यास मदत केली. पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने (११ चेंडूत नाबाद १९) अखेरीस दोन षटकार लगावत चांगली फलंदाजी केली आणि भारताला १३६ धावांपर्यंत नेलं.

भारताने केल्या 136 धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं 131 धावांचं लक्ष्य, कसं काय?

भारताने १३६ धावा केल्या असूनही ऑस्ट्रेलियाला डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) पद्धतीमुळे १३१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. डावात सुरुवातीला सलग विकेट्स गमावल्याने शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार सहा धावांचा फटका बसला.