भारत आणि बांगलादेश संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात ७३.५ षटकांत सर्वबाद २२७ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे.

केएल राहुल आणि शुबमन गिलने भारतीय संघाच्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तोपर्यंत भारतीय संघाने ८ षटकांत बिनबाद १९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ अजून २०८ धावांनी पिछाडीवर आहे. तसेच भारतीय फलंदाज केएल राहुल ३ आणि शुबमन गिल १४ धावांवर नाबाद आहेत.

बांगलादेश संघाकडून मोमिनुल हकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १५७ चेंडूचा सामना करताना ८४ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर मुशफिकर रहीम २६, लिटन दास २५ आणि शांतोने २४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे बांगलादेश संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. याव्यतिरिक्त इतर फलंदाजाना काही खास कामगिरी करताना आली नाही. ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

हेही वाचा – अजिंक्य रहाणेचा मोठा दावा; म्हणाला, ‘या’ कारणामुळे कोहली, पुजारा आणि त्याच्या फलंदाजीची सरासरी घसरली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडून गोलंदाजी करताना उमेश यादव आणि आर आश्विनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. उमेश यादव १५ षटके गोलंदाजी करताना, २५ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आश्विनने देखील ७१ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. तसेच १२ वर्षानंतर कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या जयदेव उनाडकटने देखील २ विकेट्स घेतल्या. त्याने १६ षटकात ५० धावा दिल्या.