scorecardresearch

IND vs SL 1st T20: अखेर का नाही मिळाले अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान? बीसीसीआयला द्यावे लागले स्पष्टीकरण

IND vs SL 1st T20 Match Updates: भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाकडून दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलने महत्वाची भूमिका निभावली

IND vs SL 1st T20: अखेर का नाही मिळाले अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान? बीसीसीआयला द्यावे लागले स्पष्टीकरण
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

आशिया चषक चॅम्पियन श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका आज संध्याकाळी सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील भारताच्या संघाचा भाग असेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनाही स्थान देण्यात आले. या सामन्यात अर्शदीपला स्थान का देण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थित होणे केले जात होते. यावर बीसीसीआयने उत्तर दिले आहे.

या सामन्यात अर्शदीप उपलब्ध नसल्याची माहिती नाणेफेकीदरम्यान कार्यवाहक कर्णधार हार्दिक पांड्याने दिली. यानंतर लगेचच बीसीसीआयकडून या डावखुऱ्या गोलंदाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अर्शदीप सिंग पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे बीसीसीआयने ट्विट केले आहे. तो आजारातून पूर्णपणे बरा झालेला नाही.

अर्शदीप सिंग आजारी पडल्याचे सांगण्यात आले आहे. तो पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही. अर्शदीप सिंगला निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे. अशा परिस्थितीत या फॉरमॅटमध्ये टीम इंडियामध्ये नियमितपणे स्थान मिळवणाऱ्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला आज संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना वाटत होती.

यापूर्वी अर्शदीपच्या आजाराबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्शदीपची दुखापत शिवम मावीच्या पदार्पणाचे कारण ठरली. संघाने प्रथमच या युवा गोलंदाजाला प्लेइंग-११ चा भाग बनवले आहे.

हेही वाचा – IND vs SL 1st T20: चहलकडे इतिहास रचण्याची मोठी संधी; भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम मोडू शकतो

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवात केली. ज्यामुळे भारतीय संघ १० षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद ७५ धावा केल्या आहेत. त्यानंचतर इशान किशन ३७ आणि कर्णधार हार्दिक पांड्या २९ धावा करुन बाद झाला. तसेच शुबमन गिल आणि सूर्यकुमार प्रत्येकी ७ धावा करुन बाद झाले. त्याचबरोबर संजू सॅमसन देखील स्वस्तात परतला.

भारताचे श्रीलंकेसमोर १६३ धावांचे आव्हान –

दरम्यान भारतीय संघाने दीपक हुड्डाच्या शानदार नाबाद ४१ धावा केल्या. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी ३५ चेंडूत ६८ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला १६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट्स घेणे गरजेचे आहे. दव किती फरक पाडतो यावर पण सर्व गणित अवलंबून आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 20:57 IST

संबंधित बातम्या