Virat Kohli on MS Dhoni: आज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जाईल. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतल्याने हा सामना वेस्ट इंडिजसाठी ‘करो किंवा मरो’ असा असणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीला एम.एस. धोनीला विक्रमांच्या यादीत मागे टाकण्याची संधी आहे. मात्र, तो फलंदाजीला येतो का? आणि आला तर कोणत्या क्रमांकावर हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली फलंदाजीसाठी आला नव्हता. खरे तर, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ११४ धावांत गारद झाला. यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांना आधी पाठवण्यात आले. रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानेचं विजयी धाव घेत भारतीय संघाला ५ विकेट्सने सामना जिंकवून दिला.

हेही वाचा: IND vs WI 2nd ODI: टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला मिळणार संघात स्थान? जाणून घ्या प्लेईंग ११

सामना आधीच संपल्याने विराटला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. पण आज परिस्थिती वेगळी असू शकते. जर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली तर सर्व फलंदाज पहिल्या प्रमाणे फलंदाजी करायला येतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. अशावेळी त्याला एम.एस.धोनीचा षटकारांचा विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी असेल. जर त्याने ३ षटकार मारले तर तो धोनीशी बरोबरी करेल आणि जर त्याने आणखी १ षटकार मारला तर तो माहीच्या पुढे जाईल.

षटकारांच्या यादीत विराट कोहली एम.एस. धोनीला मागे टाकेल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याने ३५ षटकार मारले आहेत. या यादीत एम.एस. धोनी दुसऱ्या तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. एम.एस. धोनीने विंडीजविरुद्ध २८ षटकार ठोकले आहेत. कोहलीच्या नावावर आता २५ षटकार आहेत. जर त्याने या सामन्यात ४ षटकार मारले तर तो आजच या यादीत धोनीच्या वर जाईल.

हेही वाचा: T20 World Cup 2024: १० संघ, २७ दिवस ‘या’ तारखेपासून सुरु होणार टी२० विश्वचषक २०२४! वेस्ट इंडिज आणि US असणार संयुक्त यजमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरेल

भारतासाठी पहिल्या वन डेत फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी शानदार गोलंदाजी केली. दोघांनी मिळून ७ विकेट्स घेतल्या, त्यामुळे संपूर्ण विंडीज ११४ धावांवर सर्वबाद झाला. आज त्याच मालिकेतील दुसरा सामना त्याच मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सामना संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल.