scorecardresearch

इंडिया खुली बॅडिमटन स्पर्धा : लक्ष्य सेन, सायना नेहवालसह भारताचे आव्हान संपुष्टात

पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीत सातव्या मानांकित लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेकडून २१-१६, १५-२१, १८-२१ अशी हार पत्करली

इंडिया खुली बॅडिमटन स्पर्धा : लक्ष्य सेन, सायना नेहवालसह भारताचे आव्हान संपुष्टात
राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेन (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

नवी दिल्ली : राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेन आणि ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवालला गुरुवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत पराभवांचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीत सातव्या मानांकित लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेकडून २१-१६, १५-२१, १८-२१ अशी हार पत्करली. सामन्यात लक्ष्यने चांगली सुरुवात केली आणि पहिला गेम २१-१६ असा जिंकत त्याने आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये गेमकेने आपला खेळ उंचावला. त्याने हा गेम २१-१५ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये गेमके आणि लक्ष्य यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र, गेमकेने निर्णायक क्षणी गुणांची कमाई करताना गेम २१-१८ असा जिंकत सामन्यात विजय नोंदवला.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित चीनच्या चेन यु फेईने अनुभवी सायनाला २१-९, २१-१२ असे सरळ गेममध्ये नमवले.    

दुसरीकडे, महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने चीनच्या सहाव्या मानांकित झँग

शू झिआन व झेंग यू जोडीकडून ९-२१, १६-२१ अशी हार पत्करली.

सात्त्विक-चिरागची माघार

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या गतविजेत्या जोडीने सात्त्विकला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. भारतीय जोडीला चीनच्या लियू यू चेन आणि यू शुआन यि या जोडीविरुद्ध खेळायचे होते.  

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 03:38 IST

संबंधित बातम्या