IND vs AUS 2nd T20 Live Cricket Score Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी – २० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव १२५ धावांवर आटोपला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तर हर्षित राणाने ३५ धावा केल्या. या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या देखील गाठता आलेली नाही.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १२६ धावा करण्याच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने २८ धावा केल्या. तर मिचेल मार्शने ४६ धावा चोपल्या. जोश इंगलीसने इंग्लीसने २० धावांची खेळी केली. हा सामना ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

Live Updates

IND vs AUS 2nd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 सामन्याचे हायलाईट्स

17:09 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर एकतर्फी विजय! मालिकेत १-० ने घेतली आघाडी

या सामन्यात भारतीय संघाला १२६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

17:02 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: टीम इंडियाचं पुनरागमन! बुमराहने घेतल्या लागोपाठ २ विकेट्स

जसप्रीत बुमराहने लागोपाठ २ विकेट्स घेऊन भारतीय संघाला पुनरागमन करून दिलं आहे.

16:34 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: टीम डेव्हिड वरूण चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकला! ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. टीम डेव्हिड १ धाव करून माघारी परतला आहे.

16:14 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: बाऊंड्री लाईनवर तिलकचा भन्नाट कॅच! ट्रॅव्हिस हेड परतला माघारी

ट्रॅ्व्हिस हेडला बाद करण्यासाठी तिलक वर्माने बाऊंड्री लाईनवर भन्नाट झेल घेतला आहे. हेड २८ धावा करत माघारी परतला आहे.

15:34 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: अभिषेक शर्मा एकटा लढला! भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो; ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव १२५ धावांवर आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १२६ धावा करायच्या आहेत. भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तर हर्षित राणाने ३४ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

15:32 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: भारतीय संघाचे ८ फलंदाज तंबूत! कुलदीप यादव शून्यावर परतला माघारी

भारतीय संघातील ८ फलंदाज तंबूत परतले आहेत. कुलदीप यादव शून्यावर माघारी परतला आहे.

15:18 (IST) 31 Oct 2025

एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स

झेव्हियर बार्टलेटने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हर्षित राणाला बाद करत राणा-अभिषेक शर्मा जोडी फोडली. हर्षितने ३५ धावांची खेळी केली.

15:17 (IST) 31 Oct 2025

जोश इंगलिसचा अफलातून झेल

झेव्हियर बार्टलेटच्या बॉलिंगवर जोश इंगलिसने डावीकडे झेपावत अफलातून कॅच टिपला. या कॅचमुळे शिवम दुबेला ४ धावांवर परतावं लागलं.

15:02 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live Score: अभिषेक शर्माचं दमदार अर्धशतक! नंबर १ फलंदाजाची नंबर १ खेळी

अभिषेक शर्माने २३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. १३ षटकांअखेर भारताने ५ गडी बाद ९१ धावा केल्या आहेत.

14:39 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: काय गरज होती? अक्षर पटेल धावबाद होऊन परतला माघारी

भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. २ धाव पूर्ण केल्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेल धावबाद होऊन माघारी परतला आहे.

14:21 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो! तिलक वर्मा शून्यावर परतला माघारी

भारतीय संघातील ४ प्रमुख फलंदाज अवघ्या ५ व्या षटकात माघारी परतले आहेत. तिलक वर्मा शून्यावर माघारी परतला आहे.

14:17 (IST) 31 Oct 2025

IND vs AUS Live: भारताचे टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी

भारतीय संघाला या सामन्यात हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. गिल, संजूनंतर सूर्यकुमार यादव १ धाव करत माघारी परतला आहे.

14:11 (IST) 31 Oct 2025

India vs Australia 2nd T20I Live: भारतीय संघाला दुसरा धक्का! गिल पाठोपाठ संजू सॅमसन परतला माघारी

भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. शुबमन गिल अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन अवघ्या २ धावा करून माघारी परतला आहे.

14:07 (IST) 31 Oct 2025

India vs Australia Live: भारतीय संघाला पहिला धक्का! शुबमन गिल परतला माघारी

भारतीय संघाला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला आहे. संघाचा उपकर्णधार शुबमन गिल अवघ्या ५ धावा करून माघारी परतला आहे.

13:47 (IST) 31 Oct 2025

India vs Australia Live: दोन्ही संघातील खेळाडूंनी बेन ऑस्टीनला वाहिली श्रद्धांजली

हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी बेन ऑस्टीनला श्रद्धांजली वाहिली. ऑस्ट्रेलियातील क्लब क्रिकेट खेळणाऱ्या १७ वर्षीय बेन ऑस्टीनचे डोक्याला चेंडू लागून निधन झाले आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू हाताला काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

13:40 (IST) 31 Oct 2025
IND vs AUS Live Score: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत (India)अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह</p>

ऑस्ट्रेलिया (Australia)मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉयनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड

ind vs aus 2nd T20I

<strong>India vs Australia 2nd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये पार पडला. </strong>