Asia Cup 2025, IND vs OMAN Live Match Score Update: आशिया चषक २०२५ च्या गट टप्प्यातील अखेरचा सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळवला जाणार आहे. सुरूवातीचे दोन्ही सामना जिंकत भारतीय संघ सुपर फोरसाठी पात्र ठरला आहे. तर ओमानचा संघ सुरूवातीचे दोन्ही सामने गमावत स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Live Updates

India vs Oman Live Score Updates in marathi: आशिया चषकातील भारत आणि ओमान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

00:04 (IST) 20 Sep 2025
IND vs OMAN: भारताचा ओमानवर विजय

भारताकडून १९ व्या आणि २०व्या षटकात हार्दिक व अर्शदीपने विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. अखेरीस टीम इंडियाने २१ धावांनी ओमानवर विजय नोंदवला. पण ओमानने मात्र वर्ल्ड चॅम्पियन भारताला सहजी विजय मिळवू दिला नाही. ओमानच्या दोन फलंदाजांनी भारताविरूद्ध अर्धशतक झळकावली.

23:53 (IST) 19 Sep 2025
IND vs OMAN: अजून एका खेळाडूचं अर्धशतक

ओमानचा फलंदाज हमाद मिर्झानेही भारताविरूद्ध अर्धशतक झळकावलं आहे. मिर्झा ३३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा करत बाद होत माघारी परतला.

23:38 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: ओमानला विजयासाठी किती धावांची गरज

नवख्या ओमानने वर्ल्ड चॅम्पियन भारताविरूद्ध कडवी झुंज देत टीम इंडियाच्या गोलंदाजांची शाळा घेतली. ओमानला विजयासाठी १८ चेंडूत ४८ धावांची गरज आहे.

23:31 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN:आमीर कलीमचं अर्धशतक

ओमानचा सलामीवीर आमीर कलीमचं भारताविरूद्ध चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं आहे. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह अर्धशतक केलं. यासह त्याने हेल्मेट काढून जणू शतकासारखं सेलिब्रेशन केलं. तर संपूर्ण ओमान संघाने डगआऊटमध्ये उभं राहत त्याचं कौतुक केलं. भारतीय संघासमोर आशिया चषक सामन्यात अर्धशतकी खेळी करणं सोपी गोष्ट नव्हतीच.

22:58 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: कुलदीपने मिळवून दिली पहिली विकेट

ओमानच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी रचत भारतीय गोलंदाजीसमोर उत्कृष्ट फलंदाजी केली. अखेरीस कुलदीप यादवने नवव्या षटकात कर्णधार जतिंदर सिंगला क्लीन बोल्ड करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली.

22:29 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: भारतीय संघ व्यवस्थापनाचा ओमानविरूद्ध सामन्यात चकित करणारा निर्णय, कर्णधारालाच…; मीम्सचा आला पूर

IND vs OMAN: भारत आणि ओमानविरूद्ध सामन्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय पाहून चाहते अवाक् झाले आहेत. ...अधिक वाचा
22:14 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: Unlucky पांड्या! एकाच चेंडूवर संजूला जीवदान मिळालं, पण हार्दिक नको त्या पद्धतीने बाद झाला; पाहा video

Asia Cup 2025, Hardik Pandya Runout: ओमानविरूद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्या नको त्या पद्धतीने बाद झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
21:49 (IST) 19 Sep 2025
IND vs OMAN: भारताने ओमानला दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

भारतीय संघाने ८ विकेट्स गमावत ओमानविरूद्ध १८८ धावा केल्या. ओमानच्या गोलंदाजांनी भारताविरूद्ध कमालीची गोलंदाजी केली. भारताच्या सर्व फलंदाजांना फलंदाजीचा सामन्यादरम्यान सराव व्हावा यासाठी फलंदाजी क्रमात बदल करण्यात आला. त्यामुळे सलामीवीर वगळता खालील सर्व फलंदाज वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीला आले. पण यादरम्यान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं फलंदाजीला उतरला नाही. भारताच्या संघव्यवस्थापनाच्या या निर्णयाने सर्वच जण चकित झाले आहेत. भारताने अखेरपर्यंत सर्व गोलंदाजांना फलंदाजीसाठी पाठवलं, पण पॅ़ड्स घालून तयार असलेल्या सूर्याला मात्र फलंदाजीची संधी मिळाली नाही.

21:45 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: भारताने झटपट गमावल्या ३ विकेट्स

भारताने झटपट विकेट्स गमावल्याने अखेरच्या षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. तिलक वर्मा, संजू सॅमसन झेलबाद झाले तर अर्शदीप सिंग विचित्रपणे धावबाद झाला.

21:34 (IST) 19 Sep 2025
IND vs OMAN: संजू सॅमसनचं अर्धशतक

संजू सॅमसनला ओमानच्या गोलंदाजांनी जीवदान दिलं आणि त्याचा फायदा संजूने घेत अर्धशतकी खेळी केली. संजू ४५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावा करत बाद झाला. अर्धशतकानंतर सॅमसन झेलबाद झाला.

21:19 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: शिवम दुबे झेलबाद

शिवम दुबेदेखील येताच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. कलीमच्या भेदक गोलंदाजीसमोर तो ५ धावा करत माघारी परतला. यासह भारताने आतपर्यंत १५ षटकांत ५ बाद १४० धावा केल्या आहेत.

21:14 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: अक्षर पटेल झेलबाद

भारतीय फलंदाजांना सुपर फोरआधी गेम टाईम मिळावा यासाठी भारतीय खेळाडूंच्या फलंदाजी क्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. सूर्या आणि तिलक वर्मा टॉप-५ मध्ये फलंदाजीला उतरले नाहीत. चौथ्या क्रमांकावर अक्षर पटेल फलंदाजीला आला आणि त्याने महत्त्वपूर्ण धावा केल्या. पण आमीर कलीमने त्याला झेलबाद केलं. अक्षरने १३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा करत बाद झाला.

21:02 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: ओमानच्या गोलंदाजाचा 'ड्रिम बॉल' अन् गिल क्लीन बोल्ड, शुबमन मागे न पाहताच गेला मैदानाबाहेर; पाहा काय घडलं? VIDEO

Shubman Gill wicket Video: भारत आणि ओमानमधील सामन्यात टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात शुबमन गिलच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. ...वाचा सविस्तर
20:52 (IST) 19 Sep 2025

Team India: संडे डबल धमाका! दुबईत IND vs PAK सामना रंगणार, वैभव सूर्यवंशीही उतरणार मैदानात

Team India Matches On Sunday: रविवारी होणाऱ्या सामन्यात भारत- पाकिस्तान आणि भारतीय १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाचा सामना करणार आहे. ...वाचा सविस्तर
20:47 (IST) 19 Sep 2025
IND vs OMAN Live: भारताला धक्का

सामन्यातील आठव्या षटकात ओमानचा गोलंदाजी जितेन गोलंदाजीला आला. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा झेलबाद झाला. बॅटची कड घेत चेंडू थेट विकेटकिपरच्या हातात गेला. तर याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्या नॉन स्ट्रायकर एंडवर धावबाद झाला. संजूने जितेनने टाकलेला सरळ मारला आणि जितेनच्या हाताला लागून थेट स्टंसवर आदळला. खेळाडूचा हात चेंडूला लागल्याने हार्दिक धावबाद झाला.

20:37 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN Live: पॉवरप्ले

शुबमन गिलची विकेट गमावल्यानंतरही भारताने कमालीची फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी कायम ठेवली आहे तर संजूने त्याला चांगली साथ दिली आहे. अभिषेक-संजूच्या जोडीने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ६० धावा केल्या आहेत.

20:13 (IST) 19 Sep 2025

शुबमन गिल क्लीन बोल्ड

भारताला ओमानविरूद्ध सामन्यात दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर शुबमन गिल फैजल शाहच्या कमालीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला आहे.

20:00 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: "अरे देवा, मी रोहित...", सूर्याला भारत-ओमान नाणेफेकीदरम्यान रोहित शर्माची का झाली आठवण? VIDEO व्हायरल

IND vs OMAN Toss: भारताचा आशिया चषक गट टप्प्यातील अखेरचा सामना ओमानविरूद्ध खेळत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाणेपफेकीदरम्यान रोहित शर्माची आठवण काढली. ...सविस्तर बातमी
19:40 (IST) 19 Sep 2025

IND A vs AUS A: टीम इंडियाकडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी! याआधी असं कधीच घडलं नव्हतं

Indian Womens Cricket Team: भारतीय महिला संघाकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. ...सविस्तर बातमी
19:37 (IST) 19 Sep 2025
भारताची प्लेईंग इलेव्हन

भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे दोन गोलंदाज खेळताना दिसणार आहेत.

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

19:32 (IST) 19 Sep 2025
IND vs OMAN: नाणेफेक

आशिया चषक गट टप्प्यातील अखेरचा सामना भारत आणि ओमान यांच्यात होत आहे. भारतीय संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजी केली नसल्याने फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. तर ओमान गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे.

19:08 (IST) 19 Sep 2025

Rohit Sharma: "बोरिवली ते वर्ल्ड चॅम्पियनचा प्रवास..", रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सची खास पोस्ट

Mumbai Indians Post For Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...अधिक वाचा
18:08 (IST) 19 Sep 2025

Daren Sammy: भारत दौऱ्याआधी डॅरेन सॅमीची टीम इंडियाला वॉर्निंग; म्हणतो, "आमचे गोलंदाज.."

Daren Sammy On IND vs WI Series: वेस्टइंडिजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने भारत- वेस्टइंडिज मालिकेआधी मोठं वक्तव्य केलं आहे. ...सविस्तर वाचा
17:28 (IST) 19 Sep 2025

SL vs AFG: युवराजचा ६ षटकारांचा विक्रम थोडक्यात हुकला! मोहम्मद नबीने खेचले लागोपाठ ५ षटकार; पाहा Video

Mohammad Nabi Record: श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद नबीने सलग ५ षटकार खेचले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
16:10 (IST) 19 Sep 2025

IND vs OMAN: टीम इंडियाने ‘हे’ २ बदल करावे! माजी खेळाडूने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११

Asia Cup 2025: आज भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत ओमान संघाचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी माजी खेळाडूने भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे. ...वाचा सविस्तर
14:02 (IST) 19 Sep 2025

IND A vs AUS A: ध्रुव जुरेल अन् देवदत्त पडिक्कलची वादळी शतकं, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची केली धुलाई; भारतासाठी ठरले तारणहार

IND A vs AUS A: ध्रुव जुरेलच्या शतकानंतर देवदत्त पडिक्कलच्या शानदार खेळीमुळे, भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. ...अधिक वाचा
13:51 (IST) 19 Sep 2025

बुमराहला विश्रांती देणार?

‘अव्वल चार’ फेरीपूर्वी भारतीय संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकाला स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकेल. भारतीय संघ स्पर्धेत हा एकमेव सामना अबू धाबी येथे खेळणार आहे. दुबईहून अबू धाबीला जाण्यास दोन तास लागत असल्याने भारतीय संघाने सरावही न करणे पसंत केले.

13:28 (IST) 19 Sep 2025

VIDEO: 'काय? कसं?', नबीला वेलाल्गेच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच बसला धक्का, सामन्यात एका षटकात लगावलेले ५ षटकार

Asia Cup 2025: श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्यादरम्यान श्रीलंकन खेळाडूच्या वडिलांचं निधन झालं, यावर अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
12:30 (IST) 19 Sep 2025

Asia Cup 2025: ओमानविरूद्ध भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा/रिंकू सिंग, हर्षित राणा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिं, वरुण चक्रवर्ती.

11:50 (IST) 19 Sep 2025

Asia Cup 2025: आशिया चषक सुपर फोर सामन्यांचं वेळापत्रक, भारताचे सामने कधी, कुठे, केव्हा होणार? वाचा एकाच क्लिकवर

Asia Cup 2025 Super 4 Schedule: आशिया चषक २०२५ मधील सुपर फोर सामन्यांना २० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. यातील सामन्यांचं वेळापत्रक कसं असणार, जाणून घ्या. ...सविस्तर बातमी

IND vs OMAN Live Score Updates, 19 September 2025: आशिया चषक २०२५ मधील गट टप्प्यातील अखेरचा सामना आज भारतीय संघ ओमानविरूद्ध खेळणार आहे.