India vs South Africa 2nd T20 Match Highlights Scorecard, 02 October 2022: डेव्हिड मिलरची झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी निसटता विजय मिळवला. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिले रॉसो यांना भोपळाही फोडता आला नाही.त्यानंतर एडिन माक्ररमने १९ चेंडूत आक्रमक ३३ धावांची खेळी केली. मात्र ही त्याची खेळी अक्षर पटेलने दांडू गुल करत संपवली. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजी भोवती चांगलाच फास आवळला आहे. कारण सहजासहजी त्यांना धावा करता येत नाहीत. दव सुद्धा फारसे पडले नाही. पण क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांच्यातील शतकी भागीदारीने आफ्रिका सामन्यात परत आली. गुवाहाटीमध्ये सध्या सुर्यकुमार यादवची त्सुनामी आली आहे. त्याने त्याचा फॉर्म पुढे सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले. जवळपास निम्यापेक्षा कमी चेंडूत त्याने ते पूर्ण केले. १८चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच बरोबर भारताने २०० धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये १०२ धावांची भागीदारी झाली आहे. एकही असा आफ्रिकेचा गोलंदाज नव्हता की त्याला भारतीय फलंदाजांनी चोपले नाही. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव नंतर विराट कोहलीने पण आपले अर्धशतक केले असते. मात्र त्याला शेवटच्या षटकात चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २९ चेंडूत ४९ धावा केल्या. दिनेश कार्तिकच्या शेवटच्या षटकातील आतिषबाजीने भारत २३७ धावांपर्यंत पोहचला. त्याने ७ चेंडूत १७ धावा केल्या. आता विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २३८ धावांची गरज आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सहा षटकात आक्रमक सुरूवात केली.पहिल्या दहा षटकात भारतीय संघ १०० धावा फलकावर लावणार तेवढ्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यातील निम्म्या धावा या चौकार आणि षटकार यांनीच केल्या आहेत. एडन मार्कराम दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत केएल राहुलचे अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या. अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका भारताला आजपर्यंत मायदेशात जिंकता आलेली नाही त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला ही नामी संधी आहे. या सामन्यात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत सलामीवीरांनी ५० धावांची भागीदारी केली. दोघांचेही योगदान हे सारखे आहे. एकाही गोलंदाजाला त्यांनी सोडले नाही.