आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन तगड्या संघांमध्ये लढत झाली. या लढतीत दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्न केला. राजस्थानचा गोलंदाज कुलदीप सेन याने तर धडाकेबाज गोलंदाजी केली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात आरॉन फिंचसारख्या दिग्गज फलंदाजाला त्रिफळाचित केले. कुलदीपमुळेच फिंचला अवघ्या चार धावांवर तंबुत परतावं लागलं.

हेही वाचा >> सनरायझर्स हैदराबाद संकटात, वॉशिंग्टन सुंदर पुन्हा जखमी

राजस्थानने दिलेल्या १५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी कोलकाताकडून बाबा इंद्रजित आणि आरॉन फिंच ही जोडी सलामीला आली. सुरुवातीला सावध पवित्रा घेत या जोडीने धावा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र या जोडीला तोडण्यात कुलदीप सेन यशस्वी झाला. कोलकाता संघ अवघ्या १६ धावांवर असताना त्याने आरॉन फिंचला त्रिफळाचित केलं. कुलदीपची ही गोलंदाजी पाहून फिंचदेखील अवाक झाला.

कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर फिंचने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागून जमिनीवर आदळला. तसेच चेंडू जमिनीवरुन थेट स्टंप्सवर आदळला आणि काही समजायच्या आत आरॉन फिंचचा त्रिफळा उडाला. हा सर्व प्रकार पाहून फिंचदेखील गोंधळला. मैदानावरच त्याने आपली चिडचिड व्यक्त केली.

हेही वाचा >>IPL 2022, KKR vs RR : उमेश यादवची अफलातून कामगिरी, देवदत्त पडिक्कलचा टिपला भन्नाट झेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेला राजस्थान संघ खास कामगिरी करु शकला नाही. या संघाने वीस षटकांत १५२ धावा केल्या. या संघाकडून कर्णधार संजू सॅमसन याने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. तर हेटमायरनेही २७ धावा करत संघाला १५२ धावांपर्यंत घेऊन जाण्यास मदत केली.