scorecardresearch

IPL 2023: “एवढ्या सहज कसे काय…”, ऋतुराजने षटकार मारून दिग्गजांना प्रभावित केले, अनिल कुंबळेने केले कौतुक

भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल आणि अनुभवी अनिल कुंबळे यांनी गायकवाडच्या षटकार मारण्याच्या क्षमतेचे कौतुक केले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात गायकवाडने नऊ षटकार ठोकले.

IPL 2023: Anil Kumble became a fan of this class of Ruturaj Gaikwad former captain praised

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या षटकार मारण्याच्या क्षमतेने प्रभावित झाला आहे. या फलंदाजाच्या जबरदस्त टायमिंगमुळेच हे घडल्याचे तो म्हणाला. गायकवाडने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या, मात्र शुबमन गिलच्या ३६ चेंडूत केलेल्या ६३ धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने सामना जिंकला. आयपीएलच्या अधिकृत प्रसारकांनी जारी केलेल्या प्रकाशनात कुंबळे म्हणाले, “एका डावात नऊ षटकार मारणे आश्चर्यकारक आहे. त्याचे षटकारही निर्दोष होते. त्याने खूप जोरात ढकलण्याचा प्रयत्न केला असे नाही. त्याचे षटकार हे उत्तम टायमिंगचे फळ होते.

भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेलनेही गायकवाडचे कौतुक करताना म्हटले, “ऋतुराज गायकवाड वेगळ्या विकेटवर खेळत असल्याचे दिसत होते. त्याचे तंत्र वाखाणण्याजोगे आहे. पार्थिव पटेल म्हणाला की, “गिलचा फॉर्म पाहता तो या मोसमात ६०० धावा करेल असे वाटते.” तो म्हणाला, “त्याने आपल्या प्रतिष्ठेनुसार फलंदाजी केली आणि आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फॉर्म कायम ठेवला. यावेळी तो ६०० धावा करेल असे दिसते.

चेन्नई सुपर किंग्जकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा दुसरा फलंदाज ठरला आहे. चेन्नईकडून खेळताना एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मुरली विजयच्या नावावर आहे, ज्याने २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११ षटकार ठोकले होते. यावेळी माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेने कौतुक करत ऋतुराजचे गुणगान गायले. तो म्हणाला की, “एवढे सहज षटकार मारणारा खेळाडू मी भारतीय संघात पहिला नाही. बीसीसीआयच्या निवड समितीने या खेळाडूकडे लक्ष देऊन त्याला संघात कसे घेता येईल याकडे पहिले पाहिजे. असे म्हणत त्याने घरचा आहेर दिला.

हेही वाचा: Rinku Singh: ‘कधीकाळी साफसफाई करणारा आज कोलकाताचा मुख्य खेळाडू’, जाणून घ्या कारकिर्दीचा प्रवास

CSK साठी एका डावात सर्वाधिक षटकार

११ – मुरली विजय विरुद्ध आरआर, चेन्नई, २०१०

९ – रुतुराज गायकवाड विरुद्ध जीटी, अहमदाबाद, २०२३

९ – रॉबिन उथप्पा विरुद्ध आरसीबी, डीवाय पाटील, मुंबई, २०२२

९ – ब्रेंडन मॅक्क्युलम विरुद्ध एसआरएच, चेन्नई, २०१५

९ – मायकेल हसी विरुद्ध पीबीकेएस, मोहाली, २००८

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 20:40 IST

संबंधित बातम्या