Chennai Super Kings vs Gujarat Titans Highlights IPL 2024: आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने गुजरातवर सांघिक कामगिरीच्या जोरावर ६३ धावांनी केली मात. चेन्नईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद 206 धावांचा डोंगर उभारवला होता. मात्र, प्रत्युत्तरा गुजरातचा संघ केवळ १४३ धावा करू शकला.

Live Updates

CSK vs GT Highlights, IPL 2024 : यंदाच्या हंगामातील दोन्ही संघाचा हा दुसरा सामना होत. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या चेन्नईने आणि शुबमन गिलच्या गुजरातवर एकतर्फी ६३ धावांनी मात केली. त्याचबरोबर या हंगामातील आपला सलग दुसरा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले.

23:35 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नईचा गुजरातवर एकतर्फी विजय, सांघिक कामगिरीच्या बळावर ६३ धावांनी केली मात

आयपीएल २०२४ मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्जने हा सामना ६३ धावांनी जिंकला. चेन्नईचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. तर गुजरातचा हा पहिलाच पराभव आहे. २०७ धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ केवळ १४३ धावा करू शकला.

गुजरातकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने सर्वाधिक ३७ धावांची खेळी खेळली. याशिवाय ऋद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलर यांनी २१-२१ धावांची खेळी केली. तर विजय शंकरने १२ आणि उमरझाईने ११ धावा केल्या. चेन्नईकडून गोलंदाजी करताना दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिझूर यांनी २-२-२ बळी घेतले. याशिवाय पाथिरानाने एक विकेट घेतली.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि निर्धारित षटकांत केवळ १४३ धावाच करता आल्या. गुजरातचा एकही फलंदाज बिनधास्तपणे खेळू शकला नाही. चेन्नईकडून दीपक चहर, मुस्तफिझूर रहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या सर्वच फलंदाजांनी वादळी खेळी करत संघाची धावसंख्या २०६ वर नेऊन ठेवली होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाड(४६) आणि रचिन रवींद्र (४६) यांनी डावाची चांगली सुरूवात करून दिली. विस्फोटक फलंदाज शिवम दुबेने चौकार-षटकारांच्या पाऊस पाडत २१ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर समीर रिझवीने ६ चेंडूत १४ धावांची छोटी पण प्रभावी खेळी केली. अशा प्रकारे गुजरातचे गोलंदाज चेन्नईच्या फलंदाजांसमोर हतबल दिसले आणि त्यांना विकेट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

23:25 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गुजरातची आठवी विकेट पडली, तेवतियाही बाद

गुजरात टायटन्सने १९ व्या षटकात १२९ धावांवर आठवी विकेट गमावली. राहुल तेवतिया ११ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. मुस्तफिझुर रहमाननेही त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

23:15 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : राशिद खानही पॅव्हेलियनमध्ये परतला

गुजरात टायटन्सने १७ व्या षटकात १२१ धावांवर सातवी विकेट गमावली आहे. राशिद खान दोन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. राशिदला मुस्तफिझुर रहमानने बाद केले. येथून गुजरातला विजय मिळवणे जवळपास अशक्य झाले आहे.

23:09 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गुजरातची सहावी विकेट पडली, ओमरझाई बाद

गुजरातला ११४ धावांवर पाचवा धक्का बसला. १५व्या षटकात मथीशा पथिरानाने साई सुदर्शनला समीर रिझवीकडे झेलबाद केले.त्यानंतर १६ व्या षटकात ११८ धावांवर सहावी विकेट गमावली आहे. अजमतुल्ला उमरझाई १० चेंडूत ११ धावा करून बाद झाला. गुजरातला विजयासाठी २८ चेंडूत ८९ धावांची गरज आहे. येथून चेन्नईचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे.

23:02 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गुजरातच्या हातातून सामना निसटत चालला

१४ षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात ११० धावा आहे. गुजरातला आता ३६ चेंडूत विजयासाठी ९७ धावा करायच्या आहेत. साई सुदर्शन २७ चेंडूत ३५ धावांवर खेळत आहे. तर अजमतुल्ला उमरझाई सात चेंडूत सहा धावांवर खेळत आहे. सामना गुजरातच्या हाताबाहेर गेला आहे.

22:49 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गुजरातची चौथी विकेट पडली, मिलर बाद

गुजरात टायटन्सने १२ व्या षटकात चौथी विकेट ९६ धावांवर गमावली आहे. डेव्हिड मिलर १६ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. गुजरातची धावसंख्या १२ षटकांत ४ बाद ९७ धावा. गुजरातला विजयासाठी ४८ चेंडूत ११० धावा करायच्या आहेत. साई सुदर्शन २१ चेंडूत २८ धावांवर खेळत आहे. आता अजमतुल्ला उमरझाई फलंदाजीला आला आहे.

22:38 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : डेव्हिड मिलर आणि सुदर्शनची जमली जोडी

१०व्या षटकात एकूण १३ धावा आल्या. डेव्हिड मिलरने डॅरिल मिशेलच्या षटकात एक चौकार आणि साई सुदर्शनने एक चौकार मारला. १० षटकांनंतर गुजरातची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा आहे. सुदर्शन २१ धावांवर तर मिलर १२ धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/GOATxVK18/status/1772671766520811574

22:31 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गुजरात टायटन्सला तिसरा धक्का!

गुजरात टायटन्सने आठव्या षटकात ५५ धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. विजय शंकर १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. तो डॅरिल मिशेलकरवी विकेटच्या मागे झेलबाद झाला. धोनीने शंकरचा अप्रतिम झेल घेतला. गुजरातची धावसंख्या आठव्या ओव्हरमध्ये ३ बाद ५७ धावा आहे.

22:10 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT: शुबमन गिल स्वस्तात बाद

गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि महत्त्वाचा फलंदाज शुबमन गिल ५ चेंडूत ८ धावा करत बाद झाला. दीपक चहरने त्याला आपल्या शानदार गोलंदाजीवर पायचीत केले.

21:38 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT: गुजरातच्या डावाला सुरूवात

चेन्नई सुपर किंग्सच्या २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचा संघ सज्ज झाला आहे. सलामीवीर गिल आणि साहा मैदानात उतरले आहेत.

21:23 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT: चेन्नईची वादळी फलंदाजी आणि २०० अधिक धावांचा डोंगर

चेन्नई सुपर किंग्सच्या सर्वच फलंदाजांनी वादळी खेळी करत संघाची धावसंख्या २०६ वर नेऊन ठेवली. गुजरात संघाला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड(४६) आणि रचिन रवींद्र (४६) यांनी डावाची चांगली सुरूवात करून दिली. विस्फोटक फलंदाज शिवम दुबेने चौकार-षटकारांच्या पाऊस पाडत २१ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर समीर रिझवीने ६ चेंडूत १४ धावांची छोटी पण प्रभावी खेळी केली. अशारितीने गुजरातचे गोलंदाज चेन्नईच्या फलंदाजांसमोर हतबल दिसले आणि त्यांना विकेट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

21:14 (IST) 26 Mar 2024
शिवम दुबेची वादळी फलंदाजी अन् झेलबाद

चेन्नईचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबेने मैदानावर येताच षटकाराने सुरूवात केली आणि अवघ्या २१ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. राशीद खानच्या चेंडूवर झेलबाद होण्यापूर्वी गुजरातच्या फलंदाजांची त्याने चांगलीच धुलाई केलीय

20:50 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्जला तिसरा धक्का

चेन्नई सुपर किंग्जने १३व्या षटकात १२७ धावांवर तिसरी विकेट गमावली. ऋतुराज गायकवाड ३६ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि एक षटकार आला. आता शिवम दुबे आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत.

20:45 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : शिवम दुबेने सलग दोन षटकार ठोकले

शिवम दुबे येताच त्याने साई किशोरच्या षटकात सलग दोन षटकार ठोकले. चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या आता दोन गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा आहे. ऋतुराज गायकवाड ३१ चेंडूत ४३ धावांवर खेळत आहे. तर शिवम दुबे ३ चेंडूत १३ धावांवर खेळत आहे.

20:42 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : १०४ धावांवर चेन्नईला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला

चेन्नई सुपर किंग्जने ११ व्या षटकात १०४ धावांवर दुसरी विकेट गमावली. अजिंक्य रहाणे १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. त्याला रवी साई किशोरने बाद केले.

20:26 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नईची धावसंख्या शंभरी पार! रचिनच्या विकेटनंतर ऋतुराज आक्रमक

चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या अवघ्या १० षटकांत १०० झाली आहे. गायकवाडने २९ चेंडूत ४२ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ५ चौकार आणि एक षटकार मारला आहे. तर अजिंक्य रहाणे ११ चेंडूत १२ धावांवर खेळत आहे.

20:19 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : राशिद खानच्या षटकात आल्या १० धावा

गायकवाड अफगाणिस्तानचा स्टार रशीद खानची फिरकी चांगल्या प्रकारे खेळतो.आजही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. राशिदच्या दुसऱ्या षटकात १० धावा आल्या. त्याने दोन षटकात २१ धावा दिल्या आहेत. ८ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एका विकेटवर ८४ धावा आहे. गायकवाड २८ आणि रहाणे सहा धावांवर खेळत आहेत.

20:10 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : वादळी सुरुवातीनंतर चेन्नईला पहिला धक्का! रचिन रवींद्रचे ४ धावांनी अर्धशतक हुकले

पॉवरप्लेमध्ये चेन्नईचा दबदबा दिसून आला. रचिन रवींद्रने स्फोटक शैलीत ४६ धावांची खेळी केली. मात्र अवघ्या ४ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. संघाला पहिला झटका ६२ धावांच्या स्कोअरवर बसला. पॉवर प्लेपर्यंत चेन्नईने ६९ धावा केल्या आहेत. आता सर्वांच्या नजरा कर्णधार गायकवाडकडे लागल्या आहेत.

20:04 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नईच्या धावसंख्येने ओलांडला ५० धावांचा टप्पा

रचिन रवींद्रने आपल्या झंझावाती फलंदाजीने चेपॉकचे वातावरण बदलून टाकले आहे. रचिनने १८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तो ४२ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत कर्णधार गायकवाड १२ चेंडूत १३ धावांवर खेळत आहे. चेन्नईची धावसंख्या ५ षटकात एकही विकेट न गमावता ५८ धावा झाली आहे.

19:54 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नईची दमदार सुरुवात, चार षटकात कुटल्या ४० धावा

गुजरातविरुद्ध चेन्नईने धमाकेदार सुरुवात केली आहे. युवा फलंदाज रचिन रवींद्रने केवळ १३ चेंडूत ३१ धावा केल्या आहेत. त्यामुळे सीएसकेने ४ षटकांपूर्वीच ४० धावांचा टप्पा ओलांडला आहे. गुजरातचा संघ विकेटच्या शोधात आहे.

19:50 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नईची झंझावाती सुरुवात

रचिन रवींद्रने चेन्नई सुपर किंग्जला झंझावाती सुरुवात करून दिली आहे. रचिन १० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २० धावांवर खेळत आहे. तर गायकवाड चार धावांवर खेळत आहेत. ३ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या एकही विकेट न गमावता २५ धावा आहे.

19:41 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाडकडून चेन्नईची डावाला सुरुवात

चेन्नईची फलंदाजी सुरू झाली आहे. सध्या कर्णधार रुतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र क्रीजवर आहेत. गुजरातसाठी अजमतुल्ला उमरझाईने पहिले षटक टाकले.

19:14 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

19:10 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : चेन्नईने नाणेफेक जिंकली, गुजरात प्रथम फलंदाजी करणार

चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामना सुरू होण्यास अवघे काही मिनिटे शिल्लक आहेत. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

18:49 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : दोन्ही संघांत कोणाचे पारडे जड?

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ५ सामने झाले आहेत. गुजरातने ५ पैकी ३ वेळा तर चेन्नईने २ वेळा बाजी मारली आहे. आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली होती. शेवटी या साम्यात रोमहर्षक पद्धतीने सीएसकेने विजेतेपद पटकावले.

18:40 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गुजरात टायटन्सच्या फलंदाजांवर नजर असणार

चेन्नईने आपल्या फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. दुसरीकडे गुजरातला सामना जिंकायचा असेल, तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नव्हते. मात्र, त्याच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे संघाला सामना जिंकण्यात यश आले.

18:34 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : दोन्ही कर्णधारांच्या संघांत स्टार खेळाडूंचा भरणा

रणनीती कौशल्यात पारंगत असलेले मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि अनुभवी डेव्हिड मिलर आणि केन विल्यमसन यांच्या उपस्थितीने शुबमनचे कार्य सोपे होते. दुसरीकडे गायकवाडला करिष्माई धोनीची साथ मिळते. गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईतील पहिल्या सामन्यात आरसीबीचा ६ गडी राखून पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती.

18:27 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : दोन युवा कर्णधारांमध्ये होणार टक्कर

या सामन्यात प्रथमच कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या दोन कर्णधारांमध्ये स्पर्धा आहे. या मोसमापूर्वी गुजरातने शुबमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली. त्याचवेळी चेन्नईनेही हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधी ऋतुराजला कर्णधार बनवले. ऋतुराजला टीम इंडियाचे कर्णधारपदाचा अनुभव आहे, मात्र त्याने कधीही आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलेले नाही. त्याचबरोबर शुबमन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात शुबमन गिल आणि ऋतुराजला गायकवाड या दोन नवीन कर्णधारांच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागणार आहे.

18:20 (IST) 26 Mar 2024
CSK vs GT : गतवर्षाच्या उपविजेत्यासमोर विजेत्याचे आव्हान, कोण मारणार बाजी?

आजचा सामना गेल्या मोसमातील अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये होणार आहे, ज्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जबरोबरचा मागील हंगामातील बदला घेण्याचा प्रयत्न करेल. आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात या दोन संघांमध्ये विजेतेपदाचा सामना खेळला गेला, जिथे सीएसकेने रोमांचक सामन्यात विजय मिळवून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

CSK vs GT Highlights, IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात चेन्नई गुजरातचा पराभव केला. या सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सवर ६३ धावांनी मात केली.