IPL Final Man of the Match winners List in 17 Years : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा अंतिम सामना चालू आहे. जगभरातील क्रिकेटरसिकांचं या सामन्याकडे लक्ष आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक उंचावलेला नाही. त्यामुळे यंदा नवा विजेता संघ आपल्याला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण आयपीएल इतिहासातील १७ हंगांमांमधील अंतिम सामन्यांची उजळणी करणार आहोत.
आतापर्यंतच्या १७ हंगामांमध्ये कोणत्या संघांनी बाजी मारली व त्या संघांना अंतिम सामन्यात कोणी विजय मिळवून दिला ते आपण पाहणार आहोत. १७ अंतिम सामन्यांमधील सामनावीरांची यादी पाहणार आहोत.
स्पर्धेवर मुबई व चेन्नईच्या खेळाडूंचा दबदबा
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज हे सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येक पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सहाजिकच या संघांच्या सर्वाधिक खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. यासह कोलकाता नाइट रायडर्सने तीन वेळा आयपीएल चषक उंचावला आहे. तर, राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स हैदराबाद, सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी एक वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे.
आयपीएल फायनलमधील आजवरचे १७ सामनावीर
वर्ष | सामना | खेळाडू |
२००८- | राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज</td> | युसुफ पठाण |
२००९- | डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | अनिल कुंबळे |
२०१०- | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स | सुरेश रैना |
२०११- | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | मुरली विजय |
२०१२- | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज | मनविंदर बिस्ला |
२०१३- | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज | कायरन पोलार्ड |
२०१४- | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज</td> | मनीष पांडे |
२०१५- | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज | रोहित शर्मा |
२०१६- | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | बेन कटिंग |
२०१७- | मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट | कृणाल पंड्या |
२०१८- | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद | शेन वॉटसन |
२०१९- | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज | जसप्रीत बुमराह |
२०२०- | मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स | ट्रेंट बोल्ट |
२०२१- | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स | फाफ डू प्लेसिस |
२०२२- | गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स | हार्दिक पंड्या |
२०२३- | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स | डेव्हॉन कॉनवे |
२०२४- | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद | मिचेल स्टार्क |
२०२५ – | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज | ? |