scorecardresearch

Premium

IPL 2023 Final : ‘रिझर्व्ह डे’ला धोनी घेणार निवृत्ती? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही असाच घेतला होता निरोप, जाणून घ्या पाऊस अन् माहीचं नातं

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सीझन असेल अशी अटकळ कायम आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराचे ‘रिझर्व्ह-डे’शी जुने नाते आहे.

MS Dhoni: Will Dhoni say Goodbye to the fans on the day of Reserve-Day itself Took farewell from international cricket in the same way
धोनी या वर्षाच्या अखेरीस आयपीएलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

MS Dhoni And Reserve Day: आयपीएल २०२३चा अंतिम सामना २८ मे रोजी होणार होता. मात्र पावसामुळे आता हा सामना २९ मे रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना इतिहासजमा होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिवसाचा सामना रिझर्व्ह डेसाठी खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सीझन असेल, अशी अटकळ कायम आहे.

राखीव दिवशीच धोनी चाहत्यांना ‘गुडबाय’ म्हणणार?

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस. धोनी याचा राखीव दिवसाशी जुना संबंध आहे. महेंद्रसिंग धोनी याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता जेव्हा तो राखीव-दिवसाच्या दिवशी सामना खेळला होता. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२३चा अंतिम सामना माहीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो, अशी अटकळ पुन्हा एकदा वर्तवली जात आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

हेही वाचा: IPL 2023 Final: ‘रिझर्व्ह डे’मुळे टीम इंडियाचं वाढलंय टेन्शन! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभवाला आयपीएल फायनल ठरू शकते कारणीभूत

२०१९ मध्ये चाहत्यांना मोठा धक्का बसला होता

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी झाला. पण पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मँचेस्टरमध्ये राखीव दिवशी पूर्ण झाला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. या सामन्यानंतर, एम.एस. धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये निवृत्तीची घोषणा केली.

एम.एस. धोनी इतिहास रचण्याच्या जवळ

आयपीएल २०२३चा अंतिम सामना एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील २५०वा सामना असेल. आयपीएलच्या इतिहासात २५० सामने खेळणारा एमएस धोनी पहिला खेळाडू ठरणार आहे. धोनीने आतापर्यंत २४९ आयपीएल सामन्यांमध्ये २१७ डावांमध्ये ३९.०९च्या सरासरीने ५.०८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २४ अर्धशतके झळकावली आहेत. लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो सातवा खेळाडू आहे. त्याच वेळी, एम.एस. धोनी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून २२५ सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये एमएस धोनी ३२ सामने जिंकले आहेत आणि ९१ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा: WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघात स्थान, ICCने विशेष अपडेट केले जारी

विजयाने किंवा पराभवाने आयपीएल कारकीर्द संपुष्टात येऊ शकते

विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर धोनीने त्या वर्षी एकही सामना खेळला नाही. पुढच्या वर्षी, कोरोना महामारीमुळे, मार्च महिन्यात खेळाशी संबंधित उपक्रम थांबले आणि ऑगस्ट महिन्यात धोनीने लॉकडाऊनमध्ये निवृत्तीची घोषणा केली. अशाप्रकारे हा धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. आयपीएलमधून निवृत्तीबाबत धोनीने म्हटले आहे की, “आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मी याबाबत विचार करू.” अशा परिस्थितीत धोनी या वर्षाच्या अखेरीस आयपीएलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 16:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×