चेन्नई सुपर किंग्सचा थाला महेंद्रसिंग धोनी आयपीएलचे सर्व हंगाम खेळणारा खेळाडू आहे. चेन्नईकडून खेळताना धोनीच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. फलंदाज, विकेटकिपर आणि चेन्नईचा खेळाडू म्हणून धोनीने कायमचं सर्वांना प्रभावित केले आहे. आता पंजाबविरूद्धच्या सामन्यातही धोनीने क्षेत्ररक्षण करताना ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केला आहे.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र हर्षल पटेलच्या चेंडूवर तो गोल्डन डक बाद झाला. तुफान फॉर्मात असलेला धोनी या सामन्यात मात्र बॅटने फेल ठरला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना सिमरजीत सिंगच्या चेंडूवर धोनीने जितेश शर्माचाअप्रतिम झेल टिपला. यासह धोनी आयपीएलच्या इतिहासात १५० झेल घेणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला १५० झेल घेता आले नव्हते.

धोनीने आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून १४६ आणि क्षेत्ररक्षक म्हणून ४ झेल घेतले आहेत. या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४४ झेल घेतले आहेत, त्यापैकी १३६ झेल त्याने यष्टिरक्षक म्हणून आणि ८ झेल क्षेत्ररक्षक म्हणून घेतले आहेत.

आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:
१५० – एमएस धोनी
१४४ – दिनेश कार्तिक
११८ – एबी डिव्हिलियर्स
११३ – विराट कोहली<br>१०९ – सुरेश रैना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यष्टीच्या मागे धोनी एक उत्कृष्ट यष्टीरक्षक तर आहेच. पण धोनी एक उत्तम फिनिशर आहे. धोनीने आतापर्यंत २६१ सामन्यांमध्ये ५१९२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे.