IPL 2025 RCB vs CSK Highlights: आरसीबीने अखेरच्या षटकात चेन्नईवर २ धावांनी विजय मिळवत इतिहास घडवला. आरसीबीने आयपीएल इतिहासात प्रथमच चेन्नईचा एका सीझनमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये पराभव केला आहे. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत १६ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला असून प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे.

Live Updates

IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Highlights: आयपीएल 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हायलाईट्स

23:18 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: अखेरच्या षटकात धोनी बाद

यश दयालच्या अखेरच्या षटकात एम एस धोनी तिसऱ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. यासह चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत १३ धावांची गरज आहे.

23:03 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE:

लुंगी एनगिडीने १७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आयुष म्हात्रे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ९४ धावांवर झेलबाद झाला. तर पुढच्याच चेंडूवर डेवाल्ड ब्रेविस पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण वेळेत डीआरएस न घेतल्याने आणि टाईमर न दाखवल्याने अजून एक विकेट मिळाली. यासह आता चेन्नईला विजयासाठी २१ चेंडू ४२ धावांची गरज आहे.

22:38 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: १३ षटकांत किती धावा?

सीएसकेने १३ षटकांत २ बाद १४० धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रे अर्धशतक करत मैदानात आहे तर रवींद्र जडेजा त्याला चांगली साथ देत आहे. यासह चेन्नईला विजयासाठी ४२ चेंडूत ७४ धावांची गरज आहे.

22:36 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: विराट कोहलीकडे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी

११व्या षटकात हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने कर्णधार रजत पाटीदार मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी भंडागे सबस्टिट्यूट म्हणून उतरला. तर विराट कोहली संघाचा कर्णधार आहे.

22:33 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: आयुष म्हात्रेचं पहिलं अर्धशतक

आयुष म्हात्रेने २५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा करत आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने पुढच्या षटकात १४ धावा करत चेन्नईला महत्त्वपूर्ण धावा करून दिल्या.

21:57 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: दुसरी विकेट

आरसीबीकडून हेझलवुडच्या जागी खेळत असलेल्या लुंगी एनगिडीने पहिल्याच षटकात १ धाव देत विकेट घेतली. सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच गेला आणि जितेश शर्माने टिपला. यासह आरसीबीला दुसरी विकेट मिळाली. यासह चेन्नईने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५८ धावा केल्या.

21:52 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: पॉवरप्लेमध्ये पहिली विकेट

चांगल्या सुरूवातीनंतर कृणाल पंड्याच्या पाचव्या षटकात मोठा फटका खेळताना शेख रशीद झेलबाद झाला. यासह चेन्नईने पॉवरप्लेमध्ये पहिली विकेट गमावली आहे. चेन्नईने यासह पाच षटकांत १ बाद ५७ धावा केल्या.

21:50 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: एका षटकात २६ धावा

मुंबईकर आयुष म्हात्रेने भुवनेश्वर कुमारच्या षटकात चौकारांची हॅटट्रिक लगावली. संपूर्ण षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत त्याने २६ धावा कुटल्या. यासह चेन्नईने चांगली सुरूवात करत ४ षटकांत बिनबाद ४९ धावा केल्या आहेत.

21:20 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: आरसीबी २०० पार

रोमारियो शेफर्डच्या १४ चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या ५३ धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावांचा टप्पा गाठला. शेफर्डने १९व्या षटकात ३३ तर २० षटकांत २० धावा कुटल्या. १८व्या षटकात आरसीबी धावसंख्या १५९ होती. पण २ षटकांत रोमारियोने फटकेबाजीने धावसंख्येचा चेहरामोहरा बदलला. या खेळीसह रोमारियोने आयपीएल इतिहासातील दुसरं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे.

विराट कोहली आणि जेकब बेथल यांनी ९७ धावांची भागीदारी करत आरसीबीला चांगली सुरूवात करून दिली. विराट कोहली ६२ धावा तर बेथल ५४ धावा करत बाद झाले. पण संघाला चांगली धावसंख्या गाठून देण्यात शेफर्डने महत्त्वाची भूमिका बजावली.

21:20 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: शेफर्डची वादळी खेळी

रोमारियो शेफर्डने खलील अहमदच्या १९व्या षटकात तब्बल ३३ धावा कुटल्या आहेत. खलील अहमदच्या षटकात त्याने ४ षटकार आणि दोन चौकार लगावत वादळी खेळी केली.

21:14 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: एका षटकात ३३ धावा

रोमारियो शेफर्डने खलील अहमदच्या १९व्या षटकात तब्बल ३३ धावा कुटल्या आहेत. खलील अहमदच्या षटकात त्याने ४ षटकार आणि दोन चौकार लगावत वादळी खेळी केली.

21:00 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: पाटीदार झेलबाद

१८व्या षटकात पथिरानाने चौथ्या चेंडूवर रजत पाटीदार ११ धावा करत बाद झाला. यासह आरसीबीला पाचवा धक्का बसला आणि याचबरोबर संघाच्या धावांनाही मोठा ब्रेक लागला आहे. वादळी सुरूवातीनंतर आरसीबीचा संघ १८ षटकांत फक्त १५९ धावाच करू शकला आहे.

20:52 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: २ षटकांत २ विकेट

१६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथिरानाने जडेजाला झेलबाद केलं. पडिक्कल १५ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासब १७ धावा करत बाद झाला. तर नूर अहमदच्या १७व्या षटकात जितेश शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. १७ षटकांत ४ बाद १५४ धावा केल्या आहेत.

20:36 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: विराट झेलबाद

१२व्या षटकात सॅम करनने पाचव्या चेंडूवर खलील अहमदकरवी झेलबाद केले. विराट ३३ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावा करत माघारी परतला. यासह आरसीबीने १२ षटकांत २ बाद १२२ धावा केल्या आहेत.

20:22 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीने २९ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावा करत यंदाच्या आय़पीएलमधील सातवं अर्धशतक झळकावलं. विराटने जडेजाच्या ११व्या षटकात १७ धावा कुटत संघाच्या धावांची गती कायम ठेवली. यासह आरसीबीने ११ षटकांत १ बाद ११४ धावा केल्यात.

20:20 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: जेकब बेथल झेलबाद

अर्धशतकी खेळीनंतर १० व्या षटकात मथिशा पथिरानाच्या गोलंदाजीवर बेथल झेलबाद झाला. डेवाल्ड ब्रेविसने सीमारेषेजवळ अजून एक कमालीचा झेल टिपत संघाला पहिली विकेट मिळवून दिली.

20:13 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: जेकब बेथलचं अर्धशतक

आरसीबीचा नवा सलामीवीर जेकब बेथलेने २८ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा करत वादळी अर्धशतक झळकावल. विराटसह तो ९४ धावांची भागीदारी करत अजूनही मैदानावर कायम आहे. गेल्या सामन्यात पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर जेकबने आपल्या कामगिरीची झलक सर्वांना दाखवली आहे.

19:56 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: विराट-बेथलची वादळी सुरूवात

विराट कोहली आणि जेकब बेथल यांनी वादळी सुरूवात करत ५ षटकांत आरसीबीला ६० धावांचा टप्पा गाठून दिला. बेथल २३ चेंडूत ४२ धावा तर विराट ७ चेंडूत १८ धावा करत खेळत आहे.

19:40 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: आरसीबीची चांगली सुरूवात

आरसीबीचा नवा सलामीवीर जेकब बेथलने खलील अहमदच्या पहिल्याच षटकात चौकारांची हॅटट्रिक लगावत चांगली सुरूवात केली आहे. यासह आरसीबीने पहिल्याच षटकात १३ धावा केल्या आहेत.

19:12 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन:

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, दीपक हुडा, एमएस धोनी (विकेटकिपर/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथीशा पाथिराना

19:12 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग इलेव्हन

जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकिपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल

19:06 (IST) 3 May 2025
RCB vs CSK LIVE: नाणेफेक

चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नाणेफेक झाली असून चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल झालेला नाही. तर आरसीबीच्या ताफ्यात आजही फिल सॉल्ट खेळताना दिसणार नाही. तर गोलंदाजीत जोश हेझलवुडच्या जागी लुंगी एनगिडी खेळताना दिसेल.

18:54 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड

18:53 (IST) 3 May 2025

RCB vs CSK LIVE: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ

एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, आयुष म्हात्रे, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद, ऋतुराज गायकवाड

IPL 2025 RCB vs CSK Highlights: आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने पहिल्यांदाच चेन्नईचा सीझनमध्ये दोन वेळा पराभव केला.