राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २१७ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना सुनिल नरेनाला धावबाद व्हावं लागलंय. क्षेत्ररक्षण करत असलेल्या शिमरॉन हेटमायरला हलक्यात घेतल्यामुळे सलामीला आलेल्या सुनिल नरेनला पहिल्याच चेंडूवर शून्यावर तंबुत परतावं लागलंय.

हेही वाचा >>> पॅट कमिन्स-शिवम मावी जोडी ठरली भारी ! दोघांनी मिळून टिपला अप्रतिम झेल, रियान परागला केलं ‘असं’ बाद

नेमकं काय घडलं ?

राजस्थान रॉयल्सने केकेआरसमोर २१७ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अरॉन फिंच आणि सुनिल नरेन ही जोडी मैदानावर फलंदाजीसाठी आली. अरॉन फिंचने स्ट्राईकवर येत पहिल्याच चेंडूवर मध्यम गतीचा फटका मारला. हा फटका मारल्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे चेंडू थेट शिमरॉन हेटमायरच्या हातात पोहोचल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्याने चेंडू स्टंप्सवर मारला. पहिलाच चेंडू असल्यामुळे सुनिल नरेनने पूर्ण ताकतीने धाव घेतली नाही. मात्र हेटमायरच्या चपळाईचा फटका सुनिल नरेनला बसला. धावपट्टीवर अर्ध्यावरच असताना हेटमायरने डायरेक्ट हीट करत चेंडूने स्टंप्स उडवले. ज्यामुळे सुनिल नरेनला धावबाद व्हावे लागले

हेही वाचा >>> दिल्लीच्या ताफ्यात तिघांना करोना, IPL पुन्हा रद्द होणार ? जाणून घ्या नवे नियम

हेटमायरच्या डायरेक्ट हीटमुळे पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीला आलेला सुनिल नरेन शून्यावर धावबाद झाला. ज्याचा फटका पुढे कोलकाता नाईट रायडर्स संघाला बसला. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने सलामीला येत शतकी खेळी केली. त्याने ६१ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या. ज्यामुळे राजस्थानने केकेआरसमोर २१७ धावांचा डोंगर उभा केला.