आयपीएलचे पंधरावे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. सध्या मोजकेच साखळी सामने शिल्लक राहिले असून सर्वांनाच प्लेऑफच्या सामन्यांचा थरार अनुभवण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान शु्क्रवारी (५ मे) चेन्नईला नमवून राजस्थान रॉयल्स संघाने आपले प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. तसेच राजस्थान संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलने मोठा विक्रम रचला असून त्याचीदेखील वाहवा होत आहे.

हेही वाचा >>> ड्रेसिंग रुममध्ये त्रागा करणं भोवलं, आयपीएलने मॅथ्यू वेडवर केली ‘ही’ कारवाई

युझवेंद्र चहलने चेन्नई विरुद्ध राजस्थान या सामन्यात मोठी कामगिरी करुन दाखवली. त्याने या सामन्यात २६ धावा देत दोन बळी घेतले. या कामगिरीनंतर या एका हंगामात २६ बळी नोंदवले गेले आहेत. त्याने या हंगामात २६ विकेट्स घेऊन एकाच पर्वात सर्वात जास्त बळी घेणारा भारतीय फिरकीपटू होण्याचा मान मिळवला आहे. याआधी हा विक्रम फिरकीपटू हरभजन सिंह याच्या नावावर होता. हरभजनने आयपीएलच्या एकाच हंगामात २४ विकेट्स घेतलेल्या होत्या. २०१३ साली हरभजन सिंगने या विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा >>> दिग्गज अभिनेता आमिर खानने केली अजब मागणी, म्हणतो IPL मध्ये संधी मिळेल का? रवी शास्त्रींनीही दिलं भन्नाट उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युझवेंद्र चहलने इमरान ताहिर या फिरकी पटूची बरोबरी केली आहे. ताहीरने एकाच पर्वात २६ विकेट घेतलेल्या आहेत. दरम्यान, चहलचा संघ म्हणजेच राजस्थान रॉयल्स हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघ काही सामने खेळणार असून या सामन्यातं चहलने एक धावजरी घेतली तरी इमरान ताहीरचा विक्रम मोडीत निघेल.