द्वितीय मानांकित फॅबिआनो कारुआना या इटलीच्या खेळाडूने भारताचा विश्वनाथन आनंद याला बरोबरीत रोखले, त्यामुळे ग्रेन्के क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आनंद तिसऱ्या क्रमांकावर घसरला. आनंदचा एक गुण झाला आहे. आनंदला या लढतीत पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याचा लाभ घेता आला नाही. कारुआना याने त्याचे अनेक डावपेच हाणून पाडले. अखेर ४० व्या खेळीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

Story img Loader