scorecardresearch

Premium

KL Rahul: पहिल्या वन डेत कांगारूंना धूळ चारल्यानंतर के.एल. राहुलचे मोठे विधान; म्हणाला, “ही माझी पहिलीच वेळ…”

India vs Australia 1st ODI: पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला होता. सामन्यानंतर भारताचा हंगामी कर्णधार के.एल. राहुलने कॅप्टन्सीबाबत सूचक विधान केले आहे.

After defeated the Kangaroos in the first ODI KL Rahul Rahul's big statement Said This is not my first time holding the captaincy
भारताचा हंगामी कर्णधार के.एल. राहुलने कॅप्टन्सीबाबत सूचक विधान केले आहे. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)

India vs Australia 1st ODI: भारताने १९९६ नंतर म्हणजेच २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. १९९६ नंतर ऑस्ट्रेलियाने २००६, २००९, २०१३ आणि २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला. म्हणजे या मैदानावर ऑस्ट्रेलियाने शेवटचे चार वन डे जिंकले होते. सामन्यानंतर भारताचा हंगामी कर्णधार के.एल. राहुलने कॅप्टन्सीबाबत सूचक विधान केले आहे.

पहिल्या दोन सामन्यात के.एल. राहुल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा याच्यासह इतर वरिष्ठ खेळाडूही संघात परततील. यावेळी राहुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी साकारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या शानदार विजयानंतर लोकेश राहुलने कर्णधारपदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या नेतृत्वाविषयीच्या प्रश्नावर सूचक भाष्य केले.

After the series win against Australia K.L. Rahul's big statement Said Choosing playing XI will be headache for Rohit-Dravid
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर के.एल. राहुलचे सूचक विधान; म्हणाला, “प्लेईंग-११ निवडणे रोहित-द्रविडसाठी…”
Pat Cummins Reaction After Defeat
IND vs AUS : ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे…’; भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्स असं का म्हणाला? जाणून घ्या
Ashwin batting practice video Viral
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर रविचंद्रन आश्विनने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
spinners take all wickets against India
IND vs SL: श्रीलंका संघाने रचला इतिहास! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

हेही वाचा: IND vs AUS: ‘मिस्टर ३६०’ फॉर्ममध्ये परतला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने झळकावले तिसरे अर्धशतक; श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात

सामन्यानंतर के.एल. राहुल काय म्हणाला?

के.एल. राहुल याला सामन्यानंतर प्रेझेंटेशन दरम्यान विचारण्यात आले की, “दीर्घ काळानंतर कर्णधाराची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आली आहे. कसे वाटते?” यावर लोकेश राहुल म्हणाला, “ही माझी पहिलीचं वेळ नाहीये, माझ्याबरोबर नेहमीच असे होते. मला कर्णधारपद हाताळायची सवय आहे आणि ते मला खूप आवडते.” यावेळी त्याने मोहाली मैदानातील दमट हवामानाविषयी देखील विधान केले. यामुळे भारतीय संघाचे खेळाडूही चिंतेत दिसले.

कर्णधार राहुल म्हणाला, “दुपारी जास्त गरम होत होते. मात्र, सुरुवातीला आम्हाला हे कोलंबोतच आहे की काय, असे वाटले. संध्याकाळी मात्र, स्वर्गाप्रमाणे वाटत होते. त्याआधी दुपारच्या उकाड्याने आम्हाला त्रास झाला. तरीही खेळाडूंनी जे समर्पण वृत्ती दाखवली, ती वाखाणण्याजोगी आहे. आम्ही फक्त पाच गोलंदाज खेळवले होते. त्यामुळे त्यांना १० षटके टाकावी लागली. उकाड्यामुळे हे शारीरिकरीत्या आव्हानात्मक होऊन बसते. तरीही, आम्ही सर्वांनी आमच्या फिटनेसवर काम केले आहे आणि हे मैदानावरही दिसत होते.”

हेही वाचा: Varanasi Stadium: त्रिशूळ, डमरू अन्…; वाराणसीत पंतप्रधान मोदी आज करणार स्टेडियमची पायाभरणी, क्रिकेटचे दिग्गजांना आमंत्रण

सूर्यकुमार यादवच्या खेळीबाबत केले सूचक वक्तव्य

राहुल पुढे बोलताना म्हणाला, “ऑस्ट्रेलियाने आमच्यावर मधल्या षटकांमध्ये दबाव टाकला गेला. आम्ही चांगली सुरुवात केली, पण उकाड्यामुळे मधली षटके कठीण गेली. आम्ही ५० षटकांपर्यंत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला. मी ५० षटकांपर्यंत यष्टीरक्षण केल्यानंतर एक कठीण स्थितीत फलंदाजी करायला पोहोचलो होतो. सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजांसाठी फलंदाजी करणे हे कठीण होते. मात्र, सूर्यासोबत चांगली भागीदारी केली. आम्ही चांगले क्रिकेट शॉट्स खेळण्याविषयी बोलत राहिलो आणि भारताला विजय मिळवून दिला.”

के.एल. पुढे म्हणाला की, “शुबमन बाद झाल्यानंतर सेट फलंदाजाला बाद करणे थोडे कठीण होते. आम्ही चांगले क्रिकेट शॉट्स खेळत राहिलो, स्ट्राईट रोटेट करणे यांविषयी बोलत राहिलो. आम्हाला गोंधळून जायचे नव्हते. आम्ही योग्य तेच करत होतो. त्यामुळे आम्ही आणखी चांगल्याप्रकारे हा सामना जिंकू शकलो.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kl rahuls biggest reaction after the kangaroos sledgehammer in the first odi said im used to captaincy avw

First published on: 23-09-2023 at 15:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×