विराट कोहलीनं २०१९ मध्ये एका गेमिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. तीच कंपनी आज बीसीसीआयच्या प्रमुख प्रायोजकांपैकी एक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विराट कोहलीने केलेल्या एका गुंतवणुकीमुळे लाभाच्या पदाचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरसाठी बीसीसीआय आणि MPL (Mobile Premiere League) यांच्यात ३ वर्षांचा करार गेल्यावर्षी झाला. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत हा करार करण्यात आला असून या मार्फत बीसीसीआयला प्रत्येक सामन्यामागे ६५ लाखांचा निधी मिळणार आहे. लॉकडाउन काळात टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असलेल्या Nike कंपनीने करार वाढवून घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर बीसीसीआयने नवीन स्पॉन्सरसाठी MPL सोबत करार केला आहे.
बंगळुरु येथील गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये विराट कोहलीनं गुंतवणुक केली होती. मोबाईल प्रिमिअर लीग (एमपीएल) हा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म हा याच कंपनीच्या मालकीचा आहे. सिंगापूरमध्ये एप्रिल २०१८ मध्ये या कंपनीची नोंदणी करण्यात आलेली आहे. जानेवारी २०२० मध्ये विराट कोहली एमपीएलचा ब्रँड अँबेसेडर असल्याचे घोषित करण्यात आले होते.
फेब्रुवरी २०१९ मध्ये एमपीएलची एक स्वसाधरण सभा पार पडली होती. यामध्ये विराट कोहली तसेच कॉर्नरस्टोन नावाच्या कंपनीला कर्जरोखे देण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉर्नरस्टोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सजदेह हे मॅगपी व्हेंचर्स पार्टनर्स एलएलपी आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपीमध्ये विराट कोहलीचे भागीदार आहेत. सजदेह हे कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट कंपनीचे एक संचालक असून त्यांच्याकडे कोहली, केएल राहुल , रिषभ पंत, उमेश यादव यासारख्या भारतीय खेळाडूच्या व्यावसायिक हक्कांचे व्यवस्थापन करण्याचे काम आहे.
IND vs AUS : ४३ वर्षांनी योग जुळला; निकालही जुळणार का?
सिडनीत कशी आहे भारताची कामगिरी? जाणून घ्या आकडे
पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी नटराजन तयार, कसोटी पदार्पणाबाबत केलं महत्वाचं ट्विट
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्वाचे दोन बदल; कर्णधार, प्रशिक्षकानं दिले संकेत
जाफर गुरुजींचा कानमंत्र : वॉर्नरला बाद करण्यासाठी पंतला दिला सांकेतिक सल्ला, तुम्हाला कळतोय का पाहा